_हायकू_
माणूस जन्म
संसाराचे हे गाडे
ओढना गडे..
शिकतो शाळा
माय लावते लळा
अबाल बाळा
तरुणपणी
लग्नाचा टाक बार
थाट संसार
करतो कष्ट
तो संसार सुखाचा
पोट भुकेचा
सेवा माताची
मिळण्या आशीर्वाद
एकच नाद
म्हातारी काठी
जगतो मुलांसाठी
वयाची साठी
संसार गाणे
उरेना काही उणे
स्मशान जाणे
जगलो कसे
कश्यासाठी हे फासे
आनंद नसे..
-------------------------●●
*संदीप निंबा पाटोळे,नंदुरबार*
*9421890770*
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment