*वादळातील दीपस्तंभ*..
चौदा एप्रिल
जन्मला कोहिनुर
गावला सूर
शिकला शाळा
उच्च विद्या महान
ते संविधान
जातीय वाद
मनुस्मृती दहन
कार्य महान
महाळ तळे
पाण्याचा सत्याग्रह
फिरले गृह
रमाई माता
जगण्या परवड
नसे सवड
दलित जण
बुद्धमं शरणमं
दीक्षा नममं
6 डिसेंबर
महापरिनिर्वाण
आक्रोश जण
तो दीपस्तंभ
क्रांती वादळातील
अमर राहील....
✍🏻 *संदीप निंबा पाटोळे*..
*नंदुरबार जि. नंदुरबार*...
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment