बोंडअळीने घातले कीती थैमानं
कसं जेवू मी गुमान
चिंता लागली मनानं
किती फवारु मी औषधं
नाही त्याला काही निर्बंध
बोंडअळीचा करण्या प्रतिबंध
जैविक रासायनिक यांत्रिकचा संबंध
लावा फॅरोमन सापळे एकरी आठ
वाचवा फवारणीचा खर्च भरमसाठ
करा निंबोळी अर्काचा फवारा
नायनाट करील मावा तुडतुडयांचा सारा
दुकानदाराचं वाढंतय बील
कस करु मी पिककर्ज निल
कापसात करतो मी दिनरात कष्ट
बोंडअळीची लागली माहया शेताला दृष्ट
शेवटचा फवारा सायपर क्विनालफॉस
राजा लावु नको तु गळयाला फास
शेतकरी बोंडअळीतुन वाचला तर
हमीभाव वाढवा मायबाप सरकार
शेतकरी राजास करीतो मी विनंती
लावु नको तुमच्या फोटोसमोर पणती
✍संदीप निंबा पाटोळे, कृषि पर्यवेक्षक.
शिनकर नगर,कोकणी हिल,नंदुरबार.
मो.क्र.- 9421890770
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment