सर्व साहित्यिकांना सस्नेह नमस्कार..
मी सौरभ केदार आणि टीम,कृषि क्षेत्रामध्ये शिकत असताना साहित्याची आवड असलेले आम्ही ११ तरुण मराठी साहित्य टिकून राहावं आणि प्रगत व्हावं म्हणून साहित्य जत्रा हा ब्लॉग बनवत आहोत आणि आम्हाला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की प्रत्येक माणूस हा काहीतरी लिहीत असतो पण त्याला हवी तशी प्रसिद्धी मिळत नाही म्हणून तो आपण छान लिहू शकत नाही अस समजतो आणि साहित्य संगोपन विसरतो, म्हणूनच मा.श्री.संदीप पाटोळे याच्या मार्गदर्शनामध्ये साहित्य चळवळीची मशाल अखंड तेवत ठेवण्याचा निर्धार घेतला आहे आणि त्यासाठी आम्हाला आपले विचार/कथा/कविता/लेख/समाजातील ज्वलंत समस्या या बाबीवरील सर्व साहित्यिकांना वाचावयास मिळण्यासाठी आपणाकडून आग्रहाची विनंती करीत आहोत..
ब्लॉग बनविण्यामागील मुख्य हेतु, समाज प्रबोधनसाठी छान लेख लिहण्यासाठी प्रोत्साहन देणे. हा एक युवकांच्या लेखाला प्रकाशित करून त्यांच्या मनात साहित्याविषयीची आवड निर्माण करणे छान लेखांना वर्तमान पत्रामार्फत प्रसिध्द करणे (मूळ साहित्यिकाच्या नावाने) या आमच्या चळवळीमध्ये आपण सहभाग नोंदवावा ही विनंती
आपला पाठवत असलेले साहित्य याअगोदर कोणाच्या नावाने प्रकाशित झालेले नसावे साहित्य नगरी च्या ब्लॉग फक्त आपणास प्रसिद्धीच माध्यम देत आहे त्यामुळे साहित्य जत्रा तुमच्या साहित्याशी सहमतच असेल असे नाही आपण आपले साहित्य वर्डच्या स्वरूपमध्ये पाठवावे आणि पाठवताना ते गुगुल फॉन्ट वापरुन लिहावे. आपले लिखाण जेथे समाप्त होईल तेथेच उजव्या बाजूला आपले नाव, पत्ता,आणि दूरध्वनी क्रमांक द्यावा. साहित्य आपण या ई मेलवर पाठवावे. saurabhskedar@gmail.com. आपणास आपण पाठवलेले सर्व साहित्य पहाण्यासाठी ही लिंक पहावी लागेल
समूह प्रशासक साहित्य जत्रा परिवार
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment