इतिहास अभ्यासताना ...
आज आदरणीय धर्माधिकारी सरांच lecture झालं- 'राज्यघटना समजून घेताना.' तेव्हा कळल की आपली घटना कशी सर्वांगाने परिपूर्ण आहे ते... कायद्याचे राज्य आणि कायद्यापुढे समानता.... उत्तरदायी समाजव्यवस्था.... हे चालू असतानाच मनाची चलबिचल सुरू झाली... मन सांगत होत की आज काहीतरी लिहाव.
आजचे धावते आणि गजबजलेले समाजजीवन म्हणजे एकमेकांत competition भले मग ती विद्यार्थ्यांत असो किंवा व्यवसायात, पुढारी असो किंवा एखादा सामान्य नागरिक. आज डाॅक्टरांचा उद्या शिक्षकांचा परवा बसेसचा संप... शेतमालाला भाव नाही म्हणून अन्नाची नासधूस; शेतकरी आत्महत्या, आरक्षणासारखे मुद्दे... मग त्यात मिसळलेले unpredictable politics... असो....कोणत्या ना कोणत्या कारणाने देशाच्या कुठल्यातरी अनामिक कोपर्यात अशी आंदोलने वर्षभर चालूच असतात. तेव्हा इतिहासाचा सर्वांगाने अभ्यास करताना मनात येतं की पूर्वी तर किती दुष्काळ किंवा जुलमी राजवटींना भारताने शह दिला...पण तरीही आज भारत विविधांगी म्हणूनच ओळखला जातो. मग आजचा प्रगतीकडे वाटचाल करणारा भारतीय आपला समृद्ध इतिहास विसरत तर नाहीए ना...
जी भूमी थोर संताची, शास्त्रज्ञांची, कलावंतांची, शिवाजी महाराजांसारख्या उत्तम शासकांची, फुले, शाहू, आंबेडकरांसारख्या समाजसुधारकांची म्हणून नावारूपास आली ती म्हणजे या सर्वाना उमगलेली खरी 'प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती'. जी निसर्गातील घटकांना देवतेचे महत्त्व देते इतकेच नव्हे तर जन्मापासून मरेपर्यंतचे आयुष्य कसे व्यतीत करावे याच्या 4 आश्रमव्यवस्था सांगते.पुढे भारतात जैन, बौद्ध यांसारखे नवीन धार्मिक प्रवाह आले. तसे हळूहळू समाजात स्रीयांनाही स्थान मिळू लागले. जैन धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रम्हचर्य ही शिकवण दिली तर गौतम बुद्धांनी दुःखावर मात करण्यासाठी अष्टांग मार्ग सांगितला. चाणाक्याने त्याच्या 'अर्थशास्र' या ग्रंथात राजाने राज्य कसे करावे म्हणजे काय तर प्रशासनाने कसे कार्य करावे. शिवछत्रपतींचे हिंदवी स्वराज्य तर या सर्व गोष्टींच्या मिश्रणाचे उत्तम उदाहरण. ज्या ठिकाणी छत्रपती स्वतः म्हणतात की, 'हे हिंदवी स्वराज्य रयतेला उत्तरदायी आहे'.
मात्र आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना मनुस्मृतीचे समाजजीवनावरील वर्चस्व वाढत गेले आणि त्याचीच जागा पुढे वर्णभेद, जातिभेद, अनिष्ट प्रथांनी घेतली. परंतु आपणास हेही वगळून चालणार नाही की ज्या काही उदारमतवादी ब्रिटीशांनी भारतात सामाजिक सुधारणा केल्या त्याला विरोध करणारा आपलाच भारतीय समाज होता. ज्या ब्रिटीशांना आपण दोष देतो त्यांनी भारतीयांवर ह्याच एक कडीच्या जोरावर 150 वर्षे राज्य केले. यावर्षी आपण 72 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला मात्र तरीही ब्रिटीशांनी समाजव्यवस्थेवर घातलेले घाव आजही भारतीय माणूस भोगतोच आहे. मग ते भिमा-कोरेगाव संबंधीत असो किंवा हिंदू- मुस्लिम वाद...
आता मुद्दा आलाच आहे तर लिहावेसे वाटते की आपणा सर्वांना माहीत आहे की टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात समाजात एकता आणि प्रबोधन व्हावे म्हणून केली... मात्र आपल्याला हे कधीच माहीत नसते की जिथून त्यांना हे सुचले याचे मूळ "मोहरम" हा सण आहे.
भारतातील समाजसुधारक वेळोवेळी जातिभेद नष्ट करण्यासाठी तसेच स्रीयांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी आतोनात झटले. आणि हेच वाईट वाटते rather प्रश्नच आहे की जी पिढी स्वतःला Modern समजते, शिवाजी महाराजांना आदर्श मानते ती त्यांचे आचारविचार अंमलात आणते की नाही...
वैदिक काळात एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आज घरातील मुलगा किंवा मुलगी कमवते झाले की आईबापाला आश्रमात ठेवतात. जेव्हा वृद्ध अथवा अनाथ मुलं रस्त्याने भीक मागताना किंवा रस्त्यावर कोणीतरी टाकून दिलेलं खाताना बघितल की वाटत जो देश आधी अन्नधान्याने समृद्ध होता आणि आज वेगाने आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक प्रगती करत आहे तोच देश आतून किती मागास आहे.
भारताच्या घटनेत यांसाठी तसेच समाजातील सर्व मागास जाती- जमातींसाठी विशेष तरतूदही केल्या आहेत मात्र त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात का नाही हा प्रश्नच आहे.
जसे राज्यघटनेत दिलेली मुलभूत अधिकार आपण वापरतो तर त्याच घटनेत कलम 51 (A) मध्ये नागरिकांची देशाप्रती असलेली मुलभूत कर्तव्यही दिलेली आहेत; इतिहासाच्या सगळ्या पैलूंच्या आधारावर आपण सगळे मिळून गांधीजींच्या स्वप्नातील एक स्वच्छ आणि सुंदर भारत देश घडवूया...
शब्दांकन: शिंदे मयुरी सुनिल
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment