इंदिरा गांधी यांचे बालपण
इंदिरा गांधी या बालपणापासून महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सहवासात वाढलेलं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्यांच्या बालपणी आपल्या सवंगड्यांना सूतकताई प्रशिक्षण मिळावे म्हणून बालचक्र संघाची स्थापन तर केलीच पण सोबत वानर सेनेची स्थापना तरुण तरुणींना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेण्यसाठी स्थापन केली. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्यामुळे त्यांना १९४२ साली आठ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.शिक्षेदरम्यान त्यांची ओळख फिरोज गांधी यांच्याशी ओळख झाली आणि त्याचेच रुपांतर पुढील काळात त्यांचे विवाहामध्ये झालेले पाहायला मिळेल.
पंतप्रधान पद भूषवण्यापुर्वीचे कार्य
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या सेक्रेटरी म्हणून भूमिका पार पाडत असतांनाच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून १९५९-६० मध्ये सूत्रे हातामध्ये घेतली. पुढील काळात (१९६०-६४) देखील पंडित नेहरू यांच्या सेक्रेटरी म्हणून काम पहिले. १९६४ मध्ये नेहरूंचे निधन झाले. त्यामुळे भारताच्या पंतप्रधान पदाची सूत्रे लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे आली. लालबहादूर शास्त्री सरकारमध्ये इंदिरा गांधी यांनी माहिती संप्रेषण मंत्री म्हणून कारभार सुरु केला त्यांनी तत्कालीन ज्वलंत भाषिक प्रश्नांची (इंग्रजी-हिंदी) सोडवणूक करण्यासाठी आकाशवाणीचे स्थानिक केंद्रे सुरु केली. दरम्यानच्या काळात ताश्खंड करारा दरम्यान लाल बहादूर शास्त्री यांचे निधन (अनेक पुस्तकामध्ये हत्या झाल्याचा उल्लेख आढळतो) झाले.
कशा झाल्या इंदिराजी पंतप्रधान ?
तमिलनाडुचे मुख्यमंत्री के. कामराज होते, परंतु त्यांना मुख्यमंत्री पदापेक्षा जास्त पक्षबांधणीमध्ये रस होता. त्यांनी अनेकदा पंडित नेहरू यांना मुख्यमंत्री पदापासून मुक्त करून पक्षासाठी काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती केली त्याच कारणामुळे नेहरूंनी के. कामराज यांना केंद्रीय राजकारणात आणले. ह्या गोष्टीची आठवण ठेवून बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या अंतर्गत मोरारजी देसाई यांचा विरोध असतांनादेखील तो विरोद मोडून काढत इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी २४ जानेवारी १९६६ रोजी विराजमान केले.
इंदिरा गांधी का बनल्या आक्रमक पंतप्रधान ?
इंदिरा गांधी यांच्यासमोर पक्षांतर्गत खूप आव्हाने असल्याने त्यांनी २० महिने अभ्यासाची भूमिका घेतली (कुमार केतकर यांच्या मतानुसार). त्यानंतर त्यांनी एक किचन केबिनेट स्थापन केले. त्यातील सदस्यांपैकी पी.एन हक्सर यांच्या मदत अन सल्ल्याने बँकाचे राष्ट्रीयीकरण, प्रीव्ही पर्स बंद, हरितक्रांती यासारखे अनेक आक्रमक आणि महत्वाचे निर्णय घेतले. याअगोदर पंडित नेहरू यांच्या काही धोरणामुळे काँग्रेसचे झालेले नुकसानाची कसर या निर्णयामुळे भरून निघाली. इंदिरा गांधीची भाषणावर पकड होती. त्यांनी घेतलेले निर्णय त्यांनी जनसामान्यांसाठी कसे लाभदायक आहेत हे समजावून सांगितले आणि १९७१ च्या निवडणुकीमध्ये गरिबी हटाव नारा दिला अन स्पष्ट बहुमताने निवडून आल्या. अन खऱ्या अर्थाने इंदिरा गांधी पर्व सुरु झाले.
पर्यावरणवादी इंदिरा गांधी
५ जुलै १९७२ स्टोक होम युनायटेड नेशनचे पहिल्या जागतिक संमेलनाला यांनी उपस्थिती दर्शवली. संमेलनादरम्यान त्यांनी १४ जून १९७२ रोजी सर्व राष्ट्रांना संबोधित करत आपली पर्यावरणवादी भूमिका प्रगट करून त्या थांबल्या नाहीत. त्या मायदेशी भारतात परतल्यावर त्यांनी एक नव्हे अनेक पर्यावरणवादी निर्णय घ्यायला सुरुवात केली त्यात प्रामुख्याने वाघाच्या शिकारीवर बंदी घालत प्रोजेक्ट टायगर मिशन हाती घेत त्यांनी वन्य जीव संरक्षण कायदा-१९७२ बनवला. त्यानंतर पाणी प्रदूषण कायदा-१९७४ मंजूर करून घेतला. त्यांनी राष्ट्रीय पर्यावरण समितीची स्थापना १९७२ मध्ये करत अध्यक्ष पदाची सूत्रे स्वत: कडे ठेवली नंतरच्या काळात समितीचे रुपांतर सध्याच्या पर्यावरण मंत्रालयामध्ये झालेले आपल्या लक्षात येईल.
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती, पण का?
इंदिराजींचे निर्णय
१. १९७१ मध्ये स्पष्ट बहुमत असल्याने इंदिरा गांधी यांनी घेतलेले सर्व निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी मर्जीतील व्यक्तींच्या न्यायाधीशपदी नेमणुका केल्या.
२. घटनादुरुस्तीचा मार्ग अवलंबला.
३. १९७१ मध्ये काँग्रेसमुक्त राज्यांची सरकारे बरखास्त करून त्याठिकाणी फेरनिवडणूक घेऊन आपली सरकारे स्थापन करून मर्जीतील मुख्यमंत्री नेमले.
४. या सर्व कारणांमुळे इंदिरा गांधीना एकहाती निर्णय घेणे सोपे झाले.
या कारणामुळे आणीबाणी लावली
१. इंदिराजीच्या काळात स्वातंत्र्य लढ्यातील पिढी सरकारबाहेर होती अन त्यांना सरकार करत असलेल्या चुकीच्या निर्णयाची जाणिव त्यांना झाली अन त्याच काळात जयप्रकाश नारायण हे व्यक्तिमत्व उदयास आले, त्यांनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला.
२. त्यांच्या निर्णयाने अनेक राज्यातील जनता नाराज झाली त्यामुळे बहुसंख्य राज्यांमध्ये मुख्यामंत्र्याविरुद्ध आंदोलने सुरु झाली.
३. जॉर्ज फर्नांडीस यांनी रेल्वेसंबंधीच्या मागण्यासाठी रेल्वेचा संप पुकारला.
४. समकालामध्ये बांगलादेशमध्येही अशीच परिस्थिती उद्भवली होती म्हणून तेथील पंतप्रधान यांनी आणीबाणी लावली होती. परंतु नंतरच्या काळामध्ये त्या पंतप्रधांची हत्या झाली होती.
५. बांगलादेशाप्रमाणे अनुकरण करण्यापूर्वी इंदिराजींनी ४२ वी घटनादुरुस्ती केली तिला छोटे संविधान म्हणून देखील ओळखले जाते.
६. घटना दुरुस्ती आणि सर्व पक्षीय वाढत चालेला दबाव.
७. अलाहाबाद न्यायालयाने १९७१ च्या निवडणुकीमध्ये सरकारी साधनसामुग्रीचा वापर केल्याने लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द करत पुढील ६ वर्षासाठी निवडणूक लढण्यावर बंदी घातली गेली.
काय आहे ऑपरेशन ब्लू स्टार ?
पंजाबमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून खलीस्थानची मागणी होती आणि त्याच मुद्यावर १९६८ मध्ये पंजाबमध्ये अकालीदल पक्षाने बहुमत मिळवत सरकार स्थापन केले. पक्षामध्ये फुट निर्माण करण्यासाठी अकालींविरुद्ध अशी एखादी तरी व्यक्ती असावी जी त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याला खीळ घालू शकेल, परंतु दरम्यानच्या काळात भिंद्रनवाले याने खलीस्थान मुद्दयावर बोट ठेवत पक्षामधून बाहेर पडला. शीख लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्याने प्रयत्न करणे सुरु केले. भिंद्रनवाले वादग्रस्त मुद्द्यांवर भाषणं करत होते, शस्त्रासह मोठमोठ्या सभांमध्ये सहभाग नोंदवे परन्तु भिंद्रनवालेंला काँग्रेसने मदत केली त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दखल होऊ दिला नाही त्यापाठीमागे काँग्रेसचा उद्देश असा की पुढे पुढे आपल्या पक्षासाठी काम करतील परंतु त्यांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली होती.त्यांनी स्वत:ची एक संघटना स्थापन केली पंजाबात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत होती. चर्चेसाठी गेलेल्या नेते, अधिकारी यांच्या हत्या करू लागले. त्याच काळात पंजाबचे डी.जी. हे चर्चा करण्यासाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली त्यांना पायरीवर फेकून देण्यात आले, पोलीस प्रशासनाची त्यांचा मृतदेह थेथून परत आणण्याची हिम्मत होत नव्हती तेव्हा राष्ट्रपतींनी दूरध्वनीद्वारे संपर्क करून विनंती केली तेव्हा त्यांचा मृतदेह तेथून आणता आला. अन तिथून चालू झाले ब्लू स्टार ऑपरेशन.
सर्वात प्रथम कप्तान वैद्य बटालियन पाठवण्यात आली परंतु भिंद्रनवाले यांनी त्यांचा खात्मा केला. त्यामुळे अजित डोबाल यांना भारतात यावे लागले ते रिक्षा चालवत भिंद्रनवाले यांना भेटत पाकिस्तान एजंट असल्याचे सांगून विश्वासात घेऊन परिसराची पाहणी केली आणि संपूर्ण माहिती भारत सरकारला दिली अन नंतर भिंद्रनवाले याचा अंत केला.
नंतर मिशन व्हाईट ऑश चालवले अन रक्त धुवून काढले त्यापाठीमागचे कारण होते कि धार्मिक ठिकाणी हिंसा झाले जे समजू नये.
इंदिरा गांधी यांची हत्या का झाली?
भिंद्रनवाले यांच्या अनुयायांनी भिंद्रनवाले यांचा प्रचार सुरु केला. आणि इंदिरा गांधी यांनी शीख धर्मात हस्तक्षेप करत भिंद्रनवाले यांची हत्या केली याच मुद्द्यावरून इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्या शीख अंगरक्षकाने गोळीबार करून त्यांची हत्या केली.
लेखन व मांडणी सौरभ सुभाष केदार
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment