जळत्या विस्तवाचं शिकाळ
घोर मिटला तुझ्या काळजाचा
संपला माझा दुःखी दुष्काळ
नको खांद्यावर साहू तिरडी
मृत पावल्या या देहाची
जित्यापणी नाही भेटली
आस तुझ्या या प्रेमाची ...
नको पाजू शेवटाला पाणी
आत्म्याविना पोरक्या शवाला
हयातीत कधी न जाणले,
मनही असते मायंला...
नको वाहू ओझं तू उगा..
भरल्या पापपुण्य घागरीचे
जळत्या सरणाभोवती सडे
घालू नको तुटक्या नशिबाचे
नको नको लेकरा तू...
डाग देवू माझिया चितेला
जळत होती आतल्या आत...
झोप नव्हती कित्येक रातीला...
नको सोपस्कार दिखाव्याचे
बस, खोटे आसू गाळणे
मुक्याने सोसले जगने...
एकाकीपणाचे ते छळणे...
नको सुतक पाळू तेरा दिसाचे
नको अश्रू ढाळू मरणाचे
जळून केलीे खाक अडचण
आभार मान या सरणाचे
देवाघरी एकचं मागणे ...
नको देऊस पुन्हा आईपण
अनंत यातना सोसूनही देवा ,...
अधुरे राहीले माझे बाईपण ...
$ शब्दवेडी मिनू
संगमनेर.
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment