"असे व्हावे कधीतरी" (मीनाक्षी किलावत) - साहित्य जत्रा

Breaking

Sunday, March 17, 2019

"असे व्हावे कधीतरी" (मीनाक्षी किलावत)


मनातील द्वेशभावना जावूनी 
सूदृढ जीवन व्हावे कधीतरी 
उच्चनिच असे काहिच नसावे
शर्थीने प्रयत्न करावे करारी...
       .........असे व्हावे कधीतरी...

मला मनापासूनी वाटते
पुन्हा सतयुग इथे यावे
प्रत्येकाच्या संसारात
प्रसन्नमुखी देवच नांदावे...
     ..........असे व्हावे कधीतरी....

भयाचे सावट दुःखाचे वेध
गरीबीतिल हाल अपेष्टा सरावी
क्लेशकारक असह्य भोग नकोच 
साऱ्यांना सौख्य साधने लाभावी
       .........असे व्हावे कधीतरी....

पावित्र्य अन स्वच्छता इथे
 दृष्टिस स्वर्गापरी भासावी
जिकडे तिकडे वृक्षवेलीची
सुरेख हरीत क्रांती बहरावी.....
   ..........असे व्हावे कधीतरी.....

आंतकवाद,नक्षलवाद,सिमावाद
परोपरी मारधाड दुश्मनी संपावी
युध्दनिती नाशाचे कारण असे
विश्व शांतीवार्ता करूनी टाळावी....
            .......असे व्हावे कधीतरी.....

सर्वश्रेष्ठ जन्म हा माणसाचा
चांगले कर्म करूनी वाट चालावी,
सामाजिक बांधिलकीची
जोपासना मनापासूनी करावी....
         ..........असे व्हावे कधीतरी.....

आईवडिल व थोरामोठ्यांची सेवा
आपले आद्य कर्तव्य समजावे
वृद्धाश्रमात,अनाथालयात गरजूची
सुुश्रृशा करूनी तयांचे अश्रू पुसावे...
           .........असे व्हावे कधीतरी.....

प्रत्येक स्त्रीला व मुलींना मान
आचरणी मित्रभाव असावा
न यावा जन्मा बलात्कारी
असा आपला देश सुंदर घडावा.....
             ......असे व्हावे कधीतरी.....

मीनाक्षी किलावत, यवतमाळ
7499279847

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages