योग आपणास सुंदर व सुदृढ़ बनवतो.आपण कोणत्याही जाति धर्माचे असाल तरी योगाची मदत घेवू शकतो. योग आपल्याला बळकट व स्वस्थ बनवतो.कश्याही परिस्थितीत नियमित योगा केल्यास जीवनात कोणतीही कमी आपल्याला छळत नाही.आपले जीवन आनंदमय बणविते.योगा मध्ये इतकी ताकत असते की निर्जीवाला सजीव करू शकते.
"मी जेंव्हा चिकनगुनिया ने अपंग झाले होते.त्यावेळी अनेक औषधी व दवाखाने केले होते.पण पाहिजे तसा फायदा झाला नाही."मग मी योगाकडे धाव घेतली. योगाने मला भरपूर साथ दिली.आणि मी निरोगी,स्वस्थ झाले मला योगानेच त्यातून बाहेर काढले होते.हल्ली मी स्वास्थ जीवन व्यतीत करीत आहे .आज मी आर्ट ऑफ लिविंगची खूप-खूप आभारी आहे. योग साधनेला जर आपण आपल्या जीवनात सम्मिलित केले तर आपले जीवन शक्तिदायक, बलवर्धक व निरोगी होईल.योग हा सर्वांसाठी सुरक्षित आहे .योगा आध्यात्मिक विज्ञान दृष्टिने बघितल्यास आपल्या जीवनास पूरक संजीवनीच आहे.सर्वानाच योगा करणे आवश्यक व सुसंगत आहे. उत्तमात उत्तम सूर्य नमस्कार मोफत औषधिचा अनमोल खजाना आहे. योगा मस्तिष्क व शरीराला अती जीवनावश्यक बाब आहे. आपण सर्वानी नित्य नियमाने योगा केला पाहिजे. या धकाधकीच्या जीवनात अापल्याला शारीरिक व मानसिक स्वास्थाची गरज असते. कारण की संसारात परिवारासाठी त्यांचे भरण-पोषणासाठी सारखी धावपळ करावी लागते.गृहिनीला ही सतत आपल्या परिवारासाठी अनेक कामे करावे लागतात. तेंव्हा आपण आपल्या तब्बेतीसाठी वेळ देवू शकत नाही. आणि आपली तब्बेत जेंव्हा बिघड़ते तेंव्हा अापणास काळजी व्हायला लागते.आणि आपण डॉक्टर कड़े धाव घेतो.नानातऱ्हेची औषधी खातो.वरुण ऑपरेशन करवून घेतो.योगा ही आपल्या भारतीय संस्कृतीत रूजलेली,जन्मलेली गोड देणगी आहे.परंतू पाहिजे तसा फायदा आपण घेत नाही.त्याविरूद्ध विदेशातली लोक हल्ली मोठ्या प्रमाणात योगाभ्यास करतांना दिसतात.
योगाचे दुसरे नाव ईश्वर आहे.आपण देवावर जीतका विश्वास दाखवितो तेवढाच विश्वास योगावर करून आपण आपले स्वास्थ्य सुदृढ ठेवू शकतोय.पर आजही छोट्या गावात किंवा शहरात पाहिजे तेवढा प्रतिसाद योगाला मिळत नाही. काहीशी मानसिकता या बाबतीत वेगळी दिसते.महिला म्हणतात आम्हाला घरातच खुप कामे असतात.आम्हाला योगाची गरज नाही.परंतू योगाची गरज कुणाला नाही.जीवनात हर्ष उल्लास आणायचा असेल तर योगाला प्रथम वरदान मानावे. तेव्हाच आपण सुदृढ़ राहू शकतोय.योग हा एक्सरसाइज नसून जीवनातला अवीभाज्य कार्य मानले पाहिजे आहे. आपल्या जीवनात इंद्रधनुषी रंग भरून आनंद लूटता यावा.भरभरून नदीच्या प्रवाह सारखे आपले रक्त वाहून आंतरिक तथा बाह्य प्रगती व्हावी.बुद्धिबळ, स्वास्थ्यबळ, पदप्रतिष्ठा वाढून अापली अगम्य इच्छापूर्ति,स्वप्नापूर्ति व्हावी आणि या जीवन सृष्टिवर भरभरून आनंद मिळावा यासाठी योगा सर्वोत्तम मार्ग आहे.न भूतो न भविष्यति आशी योगाची ख्याती आहे. योगा केल्याने जीवन रूपी विशाल सागरातून आपण हसत हसत जीवन जगू शकतोय. योग आपल्या जीवनात निर्मळ प्रकाश भरतो. ऊर्जा स्रोत भरून आत्मविश्वास वाढवितो. शिक्षणात, व्यवसाय,नौकरी सर्व कामात यशस्वी करतोय.आपले शरीर सुंदर चुस्त-दुरुस्त व तरोताजा करून अंगा प्रत्यांगात उल्लास, उत्साह भरतोय. आपल्या प्रत्येक शिरा,रक्तवाहिन्या मोकळ्या करतो. कोणत्याही प्रकारची चिडचिड किंवा तनाव योगा केल्यास शांतता मिळते. कोलेस्ट्रॉल,रक्तदाब,थायराइड, मधुमेह,ब्लडप्रेशर इत्यादी आटोक्यात असतात.पचन क्रिया सुधरून गाढ झोप लागतेय.योगाचे अनेक प्रकार समाजात रूढ आहेत.जसे
सुदर्शन क्रिया,मंत्र ध्यान, योगचक्र ध्यान,सप्तचक्र ध्यान ,उपवास ध्यान,श्वासांवर केंद्रित ध्यान ,कुंडलिनी ध्यान, योग के अनेक प्रकार है।विपश्यना ध्यान,।समाधि,विचार,वाणी वर्तन ,उपाधि,अष्टांग योग ध्यान योग केल्याने अहंकार जावून सांसारिक दु:ख नष्ट होतात योगाचे दूसरे नाव परमात्माची अद्वितीय भेट आहे.योग केल्याने सात्विक,आचरण,शुद्ध मन परिणाम अढळ असतात. आणि ईश्वराचे साक्षातीकरण होते. आपल्या अंतरात व बाहेरही इंद्रिय सक्रिय करून साक्षातकार प्रत्यय होतोय.
अंतरप्रयोग, बाह्य प्रयोगने बुद्धिमत्ता तथा पद प्रतिष्ठा ही मिळते.
© मीनाक्षी किलावत
8888029763
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment