आधार (सौरभ सुभाष केदार) - साहित्य जत्रा

Breaking

Sunday, March 29, 2020

आधार (सौरभ सुभाष केदार)



कुंभारासारखा गुरु, नाही रे जगात |
वरी घालितो धपाटा, आत आधाराचा हात ||

      गुरूला कुंभाराची उपमा ही अतिशय सार्थ आहे. कारण कुंभार जसा मातीच्या घड्याला आकार देत, अनेक रूप घडवत असतो तसाच गुरु आपल्या शिष्याला घडवत असतो.
      जो मातीचा गोळा लुसलुशीत आहे म्हणजे ज्यामध्ये अहंकार, मीपणाचा लवलेश नाही, जो गुरुच्या बोधामृताने मावळ आणि अहं रहित झाला आहे. गुरु अशा गोळ्याला सुंदर आकार देतो. नराचा नारायण करतो. माणसाचा देवमाणूस घडवतो.या जडणघडणीमध्ये अनेक वेळा कुंभाराच्या हाताला धापटण्याचा मार, तडाखाही खावा लागतो.
       त्यावेळी त्या धापटीने मातीचा गोळा खराब होऊ नये, फुटू नये, आकारहीन होऊ नये यासाठी कुंभार जसा आतून आधार देतो. त्याचप्रमाणे प्रारब्धाचे तडाखे खातांना आपला शिष्य कोलमडू नये, त्याला देवत्वाचा येऊ पाहणारा आकार बिघडू नये म्हणून, सदगुरुही आपल्या आधाराचा, कृपेचा हात आतून लावूनच असतो.

1 comment:

Thank You For Visit and Comment

Pages