चला खेडी समृद्ध बनवूयात...
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ७० % लोकसंख्या ही खेड्यांमध्ये वास्तव्यास आहे. जर आपल्या देशाला खर्या अर्थाने समृद्ध, विकसित व स्वयंपूर्ण बनवायचे असेल तर प्रथमतः खेडी ही आदर्श अर्थातच स्वयंपूर्ण बनली पाहिजेत.
तरुणांनी नोकरीसाठी शहरात भटकंती करण्याऐवजी आपल्या कौशल्यांचा वापर करून स्वता:च्या गावातच स्वता:चा व्यवसाय निर्माण केला पाहिजे.शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांच्या संयुक्त अशा ऐकत्रीकरणामुळे आपण आपल्या कुटुंबियांचा, समाजाचा आणि अर्थातच गावाचा विकास साधू शकतो, कारण शेती हा ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. गावामध्ये होत असलेले भांडण-तंटे समजुतीने मिटवून व त्याचबरोबर प्रत्येक कार्यामध्ये एकोपा टिकवून आपण आपल्या गावाचा विकास साधू शकतो. ‘पाणी आडवा,पाणी जिरवा’ त्याचबरोबर ‘जल्युक्त शिवार’ यांसारख्या उपक्रमांमधून गावाच्या पाणीपातळीमध्ये निश्चितपणे वाढ होईल व गाव खऱ्याखुऱ्या अर्थाने समृद्ध ओ स्वयंपूर्ण बनण्यास मदत होईल.
महिला सक्षमीकारणासाठी बचत गटांच्या माध्यमातून आपण महिलांसाठी घरबसल्या रोजगार उपलब्ध करू शकतो. त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञानासह आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या सर्वांगीण विकासातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. त्याचबरोबर रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, इंटरनेट, इ. सेवा-सुविधांच्या गतिमान सेवेतून गावाचा विकास साधता येतो. नैसर्गिक स्त्रोतांची उपलब्धता, पाऊसमान, हवामान, जमिनीचा प्रकार, पीकपद्धती, बाजारातील गरजेचा आभ्यास करून आवश्यक अशा प्रकल्पांचे स्वरूप निश्चितीकरण करणेही गरजेचे आहे.
एखाद्या कार्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी ग्रामस्थांचा, शेतकऱ्यांचा,अबल्वृधांचा कृतीशील सहभाग तसेच श्रमदान ही अपेक्षित आहे.गावाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्वयंपूर्ण वाचनालय, शाळा व महाविद्यालय यांच्या उप्लब्ध्तेचीही तितक्याच प्रमाणात सर्वप्रथम गरज आहे.सर्वधर्म सहभाग टिकून राहण्यासाठी सर्व समाजाची प्रार्थना स्थळे असणे त्याचबरोबर प्रत्येकाने सामाजिक, भावनिक पातळीवर एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होणेही तितकेच महत्वाचे आहे. चला तर मग गाव आणि परिसरातील निसर्गाचे, पर्यावरणाचे संवर्धन करून आपली खेडी खर्या अर्थाने समृद्ध बनवूयात.
- विक्रमसिंह विलास पासले
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी
8390787896

No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment