मोबाईल आणि इंटरनेट वाईट नव्हे पण त्याचा अतिवापर जगाला लागलेली कीड
“कराग्रे वसते लक्ष्मी , करमुले तू सरस्वती
करमध्ये तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम ||”
असा श्लोक आपण आणि आपले पालक लहानपणी रोज सकाळी उठल्यावर म्हणायचे, पण आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात या श्लोकाचा अर्थच उरला नाही आणि त्याच विडंबन मात्र करण्याची परिस्थित आजच्या तंत्रज्ञानाच्या अति वापरणे आणली आहे.
“कराग्रे वसते मोबाईलम, करमुले तू फेसबुकम
करमध्ये होट्सअपम, प्रभाते मोबाईल दर्शनम ||”
आजचा दिव्य मराठीचा सर्व्हे वाचला आणि काही आकडे समोर आले.
Ø ७४% यूजर्स मोबाईल हातात घेऊन झोपी जातात,
Ø ७८% किशोरवयीन मूल हे ४ तास फोनवर व्यस्त असतात,
Ø १४% मुलांना डोकेदुखी, अनिद्र, चक्कर येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
Ø ६७% स्मार्ट फोन यूजर्स मोबाईल्च नोटिफिकेशन आल की लगेच मोबाईल उचकतात.
Ø बरचसे लोक मोबाईलला नेटवर्क नसल्यास घाबरतात,चिडचिड करतात,
आणि एक मोठे प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर उभे राहिले मोबाईल इतका वाईट आहे का? आणि मोबाईल इंटरनेट वाईट नसून त्याच्या गैरवापरची असलेली क्रेझ वाईट आहे हे लक्षात आले.
विज्ञान हे दुधारी हत्यार आहे, त्याचा वापर जसा तसे त्याचे परिणाम; चांगला केला तर चांगला किंवा वाईट केला तर वाईट. मोबाईल आणि त्यामधील इंटरनेट हे मानवजातीसाठी वरदान आहे. आणि म्हणूनच सध्या मोबाईल काळाची गरज बनला आहे.परंतु तरुणाचा मोबाईलचा गैरवापर हा चिंतेचा विषय ठरला आहे.
जेव्हा तंत्रमानवाचा गैरवापर होतो तेव्हा शाप की वरदान या विषयाला उधाण येत. आणि प्रतिगामी विचारसारणीचे लोक आपले तोंडसुख घेतात. तंत्रज्ञान चंगळवादाचे प्रतीक आहे असे आरोप होतात. एखाद्या गोष्टीचे फायदे तसेच तोटेही होणारच. हे शतक विज्ञान-तंत्रज्ञानाचे आहे. नवनवीन शोधामुळे जग ग्लोबल बनले. सर्वच आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवसमूह एक उच्च पातळीवर आलेले आहेत. नवनवीन शोधामुळे जग ग्लोबल व्हीलेज बनले आहेत. मानसाच्या स्वभावानुसार एखादी गोष्ट त्याच्यापासून गुप्त ठेवली तर त्याबद्दल आकर्षण वाढते,आणि ती चोरून बेकायदा अनाधिकृतरीत्या मिळवण्याची इच्छा बाळवते.
मुलांकडून मुलींच्या तसेच मुलींकडून मुलांच्या ई-मेल आणि एस एम एस वरुण सुरू झालेल्या देवाणघेवाणीच्या नव्या परंपरेने सायबर गुन्ह्याचेप्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आभ्यासाऐवजी मोबाईल गेम (पबजी , ब्लुव्हेल),व्हाट्स अप यामध्ये आजचे तरुण व्यसनाधीन होतायेत. मुलांमध्ये वाढत असलेले मोबाइलच्या व्यसनाला लवकर येसण घातली नाही तर भविष्यात खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल.
जेथे विविध कारणासाठी घरातील सदस्य घराबाहेर असतात. आशयावेळी एकमेकांशी संपर्क करण्यासाठी मोबाईल हे उपयुक्त्त माध्यम आहे. अलीकडे रस्त्यावरील गर्दी, वाहतूक साधनामध्ये झालेली भाडेवाढ यामुळे संपर्क करणे अवघड आहे.अशावेळी मोबाईल इंटरनेट ही काळाची गरज आहे, आणि महत्वकांक्षी व्यक्तींना तर वरदानच म्हणावे लागेल. नैसर्गिक आपतीच्यावेळी हे तंत्रज्ञान किती महत्वाचे आहे याची प्रचिती स्तुनामी लाटांच्या विध्वंसच्यावेळी जगाला आलेली आहे. शेवटी माध्यमांचा वापर आपण जसा करणार तसाच होणार म्हणून त्याचा शोध मानवी जीवनासाठी घटक आहे अस गृहीत धरू नये.
महाविद्यालयात, उच्चशिक्षण घेणारे तरुण पुस्तकांनाऐवजी मोबाईल मागतात. आणि पालकही त्याला तो घेऊन देतात. आज धावपलीच्या युगात मुलांना शेजारी,मित्र,नातेवाईकयांच्याकडे येणे-जाने म्हणजे त्रास वाटतो. आज अनेक कुटुंबामध्ये भावंडे नसतात. पालक आपल्या महत्वकांक्षा पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांचे संस्कार हे गोष्टीतच वाचायला मिळतात. आणि या सगल्यामुळे मुले मोबाईल आणि इंटरनेटमध्ये गुंततात.
गर्ल फ्रेंड बोयफ्रेंड शिवाय कॉलेज जीवन व्यर्थ आहे हा तरुनामध्ये निर्माण झालेला समज , ब्लु फिल्म चित्रपटातील उत्तेजित दृश्य यांचा सतत होणारा भडिमार यामुळे सेक्सविषयी दिवसेंदिवस वाढत असलेली उत्सुकता आणि कुतूहल आणि इच्छापूर्तीसाठी आटापिटा आणि त्यातून निर्माण होणारे विकृत गुन्हे. याला जबाबदार शेवट पालकच आहेत. मोबाईलचा खर्च वाढताना दिसल्यावर मुलांना प्रश्न विचारावेत, मोबाईलवर आणि मोबाईलच्या वापरावर लक्ष ठेवावे.
पालकांनी मुलामुलींच्या मित्रमैत्रिणीकडे लक्ष द्यावे. शिक्षकांना आधुमधून भेटून पाल्याबद्दची आणि त्याच्या प्रगतीबद्दलची चौकशी करावी. एकीकडे तंत्रज्ञानाच्या नावाने दात खायचे आणि दुसरीकडे आपल्या तरुण मुले आणि मुली कोणते कपडे घालतात याकडे दुर्लक्ष करायचे याला अर्थ नाही.
आज मोदी सरकारने अश्लील संकेतस्थळांना बंदी घातली आहे पण गल्लोगल्ली मिळणार्या अश्लील सीडीज आणि पुस्तके याला कसा आळा घालणार? कारण त्याचे मूळ संस्काराचा संवादाचा अभाव, रिकामा वेळ, पैशाची उपलब्धता यात आहे. घरातून मुलासमोर आदर्श वागणूक ठेवावी कारण मूल पालकांचे अनुकरण करतात. तसेच घरात उच्च मूल्यशिक्षण सुसंस्कृत वातावरण निर्माण करणे महत्वाचे आहे. आणि प्रसार माध्यमाणीसुद्धा अवाजवी विकृत घटना प्रसिद्ध करू नयेत.
बरेचशी मुले आज पालकांच्या हाताबाहेर गेली आहेत आणि ही आता सामाजिक समस्या बनली आहे. आणिक पालक आपल्या मुलांसमोर हतबल झालेले आहेत आणि आणि त्यांना म्हणायची वेळ आली आहे, “देवाला मागितल होत पूत तर देवानं दिल भूत” म्हणून तरुणाच्या अश्या वागण्याने कुटुंबाला समाजाला त्रास होत आहे. अनुभवी आणि निस्वार्थी माणसाने काही हिताच्या गोष्टी सांगितल्या तर त्याप्रमाणे वागावे असा उपदेश धुडकावून मन मानेल तास वागणार्याला शेवटी नुकसानच सोसावे लागते, हे सत्य तरुणांनी कायम लक्षात ठेवायला हवे.
मोबाईल इंटरनेटला दोषी ठरवणे म्हणजे साप सोडून भुई धोपटल्यागत आहे. नवीन तंत्रज्ञानाला केवळ काही वाईट घटना होतात म्हणून नाकारू नये, उलट दोषावर उपाय शोधून नविण्याने सामोरे जाणं म्हणजे आपले जीवन सुलभ करणे होय.
x
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment