आम्ही साथी (स्मिता दोशी) - साहित्य जत्रा

Breaking

Monday, February 25, 2019

आम्ही साथी (स्मिता दोशी)



     नाही मी एकटा जगू शकत.मला साथ तुझी हवी आहे.आपणएकमेकांचे साथी बनून आपलं एकाकीपण दूर करूया गं.अगं हे एकटेपण खायला उठतं मला. मला सहवास हवाय तुझा, हे एकलेपण दूर करायचंय.
     सखी, येशील ना गं माझ्या आयुष्यात. साथीदाराशिवाय आयुष्य जगणं म्हणजे पानाशिवाय झाडाचा नुसता बुंधाच.सखी, आपण दोघं मिळून या निसर्गा चा ,चराचराचा आनंद घेऊन आपलं जीवन इंद्र धनुषी करुया.
आपण एकमेकांचे साथीदार ,एकाचे दोन होऊया. मिळालेलं आयुष्य वाऱ्या प्रमाणे तरल,मंद लहरीप्रमाणं
हळूवार आयुष्य जगूया.एकमेकांची काळजी घेऊया. एकमेकांना सुख-दुखात साथ देऊया. आपले गत क्षण पुन्हा नव्याने अनुभवूया.
     येशीलना ग सखी, का सोडून गेलीस मला असा एकट्यालाच. सारेसभोवती आहेत,पणतुझी उणीव सतत जाणवत राहते.एकलेपणखायला उठतं.
तू जवळ होतीस तेव्हा मी तुझ्याकडे ज्यास्त लक्ष,ज्यास्त वेळ देऊ शकलो नाही याची खंत आता मला जाणवते आहे. अगं,पैसा कमवायच्या नादात मी त्यामागेच धावत राहिलो,तुझा अजिबात विचार केला नाही.त्यावेळी तू एकाकी पडली असशील ,तुला काय वेदना होत असतील याची जाणीव मला आता होत आहे.
     सखी चुकलंच माझं.आयुष्य एकट्यानं जगण्यासाठी नसतंच मुळी, हे मला आता पटतंय. आयुष्याचा प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगता आला पाहिजे.गेला क्षण परत येत नसतो,पण आता ती वेळ गेलीय कळतंय मला.पण सखी मला माझी चूक सुधारायची संधी देना,प्लिज.येना गं परत.आपण पुन्हा तरुण होऊया, तारूण्य भरभरून जगूया.राहिले लं सर्व काही पुन्हा मिळवूया.जगाला दाखवून देऊया. जीवनाचं लेणं कसं भरभरून जगतोय आम्ही साथी.
      हां, जीवन जगण्यासाठी साथीदाराची सोबत असायलाच हवी. मित्र हो,आपल्या साथीदारासोबत आयुष्य जगा.साथीदाराला एकलेपण देवू नका. आपल्या साथीला आपला अभिमान वाटला पाहिजे. आम्ही साथी म्हणून आपण आनंदाने ,उजळ माथ्याने जगता आले पाहिजे.
काय पटतंय ना माझं म्हणणं.आपण माझ्यासारखाच विचार करा आणि जगापुढे साथीदाराबरोबर आम्ही साथी जन्मजन्मांत रीचे हे पटवून द्या,द्याल ना------

                                                    स्मिता दोशी,सांगली

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages