फक्त तुझी साथ हवी - साहित्य जत्रा

Breaking

Friday, March 8, 2019

फक्त तुझी साथ हवी


फक्त तुझी साथ हवी 
अन्य नको मज काही
जपशील फुलासम
याची हवी मला ग्वाही... [१]

एकांताच्या सांजवेळी
सुंदरशा त्रिभुवनी
खरे झाले स्वप्न माझे
जेव्हा आलास जीवनी... [२]

दोघे एकमेकांसाठी
एक राजा, एक राणी
शुभ्र आसमानावर
चल गाऊ प्रीतगाणी... [३]

येवो कितीही संकटे
करू तयांवर मात
हवी संगत भक्कम
द्यावा तू हातात हात... [४]

संसाराच्या वेलीवर
दोन उमलली फुले
नाव करतील जगी
तुझी-माझी छान मुले... [५]

जरी कोसळे आभाळ
तरी लढावे बेभान
फक्त तुझी साथ हवी
थांबे अघोरी तूफान... [६]


No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages