एक खंत (स्वप्निल गावडे) - साहित्य जत्रा

Breaking

Tuesday, February 5, 2019

एक खंत (स्वप्निल गावडे)

      परवा कृषी विद्यापीठात माझ्या वैयक्तिक कृषी कामासाठी जाण्याचा प्रसंग आला.त्या ठिकाणी कृषी पदवी अंतिम प्रवेश फेरी होती
(Agriculture Last Round). त्यासाठी पालक आपल्या पाल्यांना सोबत घेऊन प्रवेशासाठी उपस्थित होते.त्यापैकी दोन विभिन्न प्रकारच्या पालक -पाल्यांशी भेट घडली.बोलण्याचा ओघात भविष्याबद्दल( करिअर, Future) चर्चा रंगली.

पहिले पालक उच्चशिक्षित होते. त्यांच्या मुलाला स्पर्धा परीक्षा( MPSC, UPSC) मध्ये रस होता तर त्याला त्यातच करीअर घडवायचे होते त्याला 12 वी चांगले गुण होते, पण त्याला पात्रतेसाठी कुठल्याही शाखेची पदवी (Degree)हवी होती त्यामुळे त्याने Agriculture Degree ला प्रवेश निश्चित केला.
त्याचबरोबर  शेजारचे पालकही आणि  त्यांचे पाल्य प्रवेशासाठी असुसले होते.त्यांच्या मुलाला ( पहिल्या पाल्याच्या तुलनेत) थोडेसे कमी गुण प्राप्त झाले होते.पण त्याला शेतीची अतोनात आवड आणि शेतीमध्ये येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञान बद्दल जिज्ञासा होती.शेतीत करिअर घडवण्याचे  त्याचे ध्येय जणू त्याला चैन पडू देत नव्हते.पण दुर्दैव असे की त्याला प्रवेश मिळाला नाही.
       विद्यापीठातून बाहेर पडताना माझ्या मनात तोच कृषि पदवीच्या प्रवेशाचा  विचार आणि तीच खंत होती.म्हणून त्यावर सहज विचार केला.
खरोखरच ज्या विद्यार्थ्यांना कृषि पदवीची गरज आहे त्यांना काही कारणांस्तव प्रवेश भेटत नाही.पण ज्या विद्यार्थ्यांना  कुठल्याही  कृषी पदवीची गरज नाही  तरी देखील ते विध्यार्थी कृषी पदवीला प्रवेश घेतात आणि एका गरजू विध्यार्थ्यांची जागा गुंतवतात त्यामुळे कृषीबद्दल आत्मीयता, तंत्रज्ञानाबद्दल जिज्ञासा आणि कष्टाची आतोनात तयारी  असणाऱ्या विद्यार्थ्यांला कृषी पदवीच्या शिक्षणला मुकावे लागते.आणि यामुळे सुशिक्षित आणि तंत्रज्ञानिक शेतकऱ्यांपासून आपला देश वंचित राहतो.आणी त्याचा फटका भारताला बसताना आपल्याला दिसत आहे.
कृषिप्रधान असलेला भारत देश कृषी तंत्रज्ञान,भरघोस उत्पन्न ,कृषिशिक्षण,कृषिव्यवहार यामध्ये मागे पडत आहे त्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महतेसाठी प्रवृत्त होतो.
    यातून मी सर्व पालक पाल्य यांना अवाहन आहे की ज्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रामध्ये रस नाही त्यांनी कृषिपदवी साठी प्रवेश न घेता एखाद्या गरजू विद्यार्थ्यांना त्या शिक्षनाचा लाभ होवु द्यावा.
   हीच एका कृषिदूताची आपणास कळकळीची विनंती.....                                     ✍ कृषिदूत :
                      स्वप्निल गावडे

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages