काय पाहिलंस माझ्यात?
कदर केली पदोपदी अन्
गुंफली मला कर्तव्यात ..!
रंगरुपाला नाही भाळलात
गुनाचा केला तुम्ही सत्कार
गोडी टिकावी संसारी म्हणुन
प्रयत्न करताय अपरंपार..!
स्वप्न रेखिले मधूर संसाराचे
आजचा हा दिवस प्रेमाचा
आवडती होते ना मी सख्या
कां रे लळा तुला मोबाईलचा..!
आज सजला गजरा वेणीत
रोजच असावे प्रेम सोहळ्यात
जीवनात आलेत भरूनी माझ्या
आता सुखाचे अश्रृ डोळ्यात..!
सुंदर संसार माझा फुलला
मनीचा स्वर्ग उभा वास्तव्यात
दारी फुललेल्या मोगऱ्याने
अंतरंग केले माझे सुगंधित..!
आनंदाचा नजराणा घेऊनी
उजाडला आजचा नवदिन
उसळल्या सुखाच्या लाटा
जानविते मनात संजिवन..!
©®
मीनाक्षी किलावत
7499279847
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment