खारुताई (किशोर चलाख) - साहित्य जत्रा

Breaking

Thursday, March 28, 2019

खारुताई (किशोर चलाख)

अगं अगं खारुताई
येशील  काय
अंगणात बाळासोबत
खेळशील काय

खारुताईचा पहा नखरा
पळते इकडून तिकडे
झाडावर चढतांना 
पाय करते वाकडे

खारुताई खारुताई
ये जरा इकडे
बाळ बघ आमचं
खेळता खेळता पडे

आमच्या बाळासोबत
खेळशील काय
झाडावरच फळ
आणून देशील काय

बाळ बघ कसा 
चाले भर भर 
तू जशी झाडावर
चढे सर सर 

किशोर चलाख
सांगली

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages