गाठीच्या माळा,लिंबाच लेण
समवेत नऊवारी साडी
निळ्या नभात लहरे उंचच उंच विजयाची गुढी
चैत्राची सुरुवात,साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे आजचा
"गुढीपाडव्याचा"दिवस."ब्रम्हध्वजगुढी" आपल्या स्वातंत्र्यतेचे
व विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते. मराठी महिन्यातील नववर्षाची सुरुवात तर
होते पण दिनदर्शिकामात्र बदलत नाही,कारण मराठी महीने हे फक्त अंकलिपीत जमा
झाली आहेत;असो, सणवार म्हटले
की सभोवतालचे वातावरण जलौषपूर्वक असले पाहीजे.आज जरी सण असला तरी माझे ह्रदय
वर्तमानात राहत नाहीये,माझे ह्रदय मला राहून राहून माझ्या बालपणत
घेऊन जात आहे.काय तो गुढीपाडव्याचा दिवस असायचा..........
पहाटेचे पाच वाजता,
अंगणात शेणाचा सडा नाचतो....
सप्तरंगाची उधळण होते,
सुंदर रांगोळी अंगणात सजते....
आंब्याच्या पानाचे तोरण दारावर
चढते.
असा नवीन वर्षाचा पहीला दिवस
गुढीपाडव्याचा उगवतो.नवे विचार,नवे स्वप्न,नवी आशा घेऊन नव्या उत्साहाने प्रत्येकजण
स्वतःच्या घरावर उंच गुढी उभारतो.गुढीचा आशिर्वाद घेऊन कडुनिंब व गुळाचा प्रसाद
खाऊन दिवसाची सुरुवात होते.आई व आजी पुरणाच्या स्वयंपाकात गुंतून जात.बाबा व आजोबा
कोणती नवीन वस्तु खरेदी करावी यावर विचार करत आणि आम्ही भाऊबहीण गाठी चे पुडके
घेऊन सवंगड्यांच्या घरी निघत.दिवसभर गाठी ची माळ गळ्यात घालून मनसोक्त गाठी
खात-खात पूर्ण गावात कोणाची गुढी सर्वात उंच आहे हे पाहत.पुरणपोळी चा आस्वाद घेत
दुपार सरायची आणि संध्याकाळ उजडायची धना-गुळाचा प्रसाद चढवून गुढी खाली
उतरवायची.असा "गुढीपाडव्याचा" दिवस एका झटक्यात कधी संपायचा ते समजायचे
पण नाही.
तोच दिवस तीच
परंपरा पण कमतरता का जाणवते आज समजत नही?...आधीच्या काळात लोक स्वतःच्या आनंदासाठी
सणवार साजरे करायचे पण आज मात्र हे चित्र बदलेले दिसते. आज लोक फक्त दुसऱ्याला
दाखवण्यासाठी सणवार साजरे करतात त्यामुळे परंपरा आहे पण पध्दत बदलली आहे.काळ बदलतो
तसा समाज पण बदलतो खंत एवढीच आहे की आम्ही जे आमच्या बालपणात जगलो ते ह्या नवीन
पिढीला जगता येणार नाही.
ह्या नवीन पिढीमधे एक संस्कृतीची ठिंणगी
लावणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.त्यामुळे ह्या गुढीपाडव्याला सर्वांनी
हर्षवर्धक वातावरण ठेवून योग्य पध्दतीने सण साजरा करावा.सर्वाना नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद....
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment