देवी (मीनाक्षी किलावत) - साहित्य जत्रा

Breaking

Wednesday, April 24, 2019

देवी (मीनाक्षी किलावत)


दिसते म्हणे जगाला त्या मंदिरात देवी


का मग मलाच दिसते स्त्रीच्या रुपात देवी...।।

नियमानुसार होतो सूर्यास्त सांजवेळी


 दिनरात कष्ट करुनी राही ऋणात देवी...।।

पाहत असेल बहुधा त्रागा तिची परीक्षा  


खंबीर पाय टाकत चाले उन्हात देवी.....।।

ह्रदयात आठवांची भरती अनेक वेळा


डोळ्यात आस भरुनी रमते कुळात देवी..।।

उसना उजेड कोणा मागत नसे कधीही


होती तशीच आहे सगळ्या युगात देवी...।।

काळानुसार गेल्या बदलत पिढ्या कश्या बघ


सोडून लोक जाती वृद्धाश्रमात देवी......।।

सगळा तुझ्या मुळे हा दुनियेत बोलबाला 


जगलीत माणसे ही तुझिया दुधात देवी.....।।

ममता बरीच केली झोळीत काय पडले ?


कोमेजली फुले ही ठेवी उरात देवी....।।

दाही दिशांस बघ ना भटकून राहिले मी 


या उंबऱ्यात मजला जागा तुझ्यात देवी....।।


©मीनाक्षी किलावत

8888029763


No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages