आजच्या युगातही समाजात स्त्रीजातीची व मुलींची घोर भर्सना" एका वस्तूपेक्षा जास्त तिची किंमत नाही. मुलींचा हक्क काय व किती असतो ,हे स्त्रीजातीला माहित असायला हवय.जितका हक्क मुलांचा असतो तितकाच मुलींचाही हक्क असतो.जितक्या कळा मुलींच्या जन्माच्या वेळी आईला होतात तितक्याच कळा मुलाच्यावेळीपण होतात.मुलींचे लग्न करून बाहेर पाठवणी केल्याने मुलींचा हक्क कमी होत नाही. मुलामुलींना सारखाच हक्क अर्वाचीन काळापासूनच आहे.आता कायदाही तेच म्हणत आहे.परंतू तसे समाजात दिसत नाही.मुलींना कुठे आहे समान हक्क?
मुलींचे जेंव्हा विवाह होतात तेंव्हा त्यांच्यासाठी माहेर परके होत असते.तिला लहानपणापासूनच " परके धण" म्हणुन सांभाळल्या जात असते. मुलगी विवाह झाल्यावर म्हणते!आज हे घर माझ्यासाठी परके झाले आहे.व मी आता पाव्हनी आहे. अशी कां बर ती म्हणते!
त्या मुलींना मी सांगू इच्छीते की, आपणच जर आपला अधिकार सोडला तर काय होणार.परक्यापणाचे ओझे घेऊन मनात तडफडत रहायचे.आणि आपल्या लेकींनाही हेच सांगायचे .आणि वारंवार हिच परंपरा सुरू ठेवायची.
आपण आता प्रगत देशातील सुशिक्षीत समृद्ध महिला आहोत.याची जाणिव प्रत्येक स्त्रीला व मुलींना असायला पाहिजे.निडरपणे सामना करून समान हक्कासाठी आवाज ऊठविला पाहिजे.आपण काही वस्तू किंवा जनावर नाहीत. आपण कोणतेच असे पाप केलेले नाही. मग समर्थपणे स्वाभिमानाने का नाही जगायचे?
आपला हक्क कां सोडायचा!आतापर्यंत माताबहिनीला खुप सोसाव लागले. खुप सहनशिलता बाळगली.
परंतू काळ बदललेला आहे. विचार करा आज प्रगत देशात अन्याय सहन करने यौग्य आहे कां? व तो कां करावा ? आजच्या स्त्रीया व मुलीं पुरूषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. स्त्रीया आहोत म्हणुन काय रडत बसणार आहोत. स्वता:ला कोणत्याही परिस्थितीत कमी लेखू नका.दिलेरीने वागा.व आपले जीवन व्यवस्थित करा. जर कां कोणी अपमानित केले तर उत्तर द्या.
वरवर बघता आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून आपण साजरा करायचा पण संसारातील मनात कटू अनुभव आनंद साजरा करू देत नाहीत. संसारात कुठलेही संकट येवो त्याला सामोरे जाण्याची धमक आणि कुवतही तिच्यात असते.पण ममतेचा अथाह सागर संवेदना तिच्या ह्रदयात भरलेल्या असतात;म्हणुन ती संसारात तडजोड करीत असते. हेवेदावे सांभाळते, कमीपणा घेवुन मनातल्या स्वप्नांची तिलांजली देत असते.समाजात वावरतानाही असंख्य वाईट गोष्टींचा व घराणेशाहीच्या,संस्काराच्या नावाखाली तिच्या भावना दाबल्या जातात.अनेक समस्यांंना सामोरे जावे लागत असते.सहनशक्ती पलीकडचे जगणे जगत असते. आणि तिची मजबुरी,एकाकीपणा कधी प्रेम माया भावनिक अभावामुळे स्त्रीची मानसिक अवस्था सुखाच्या शोधासाठी भटकतेय.व आधार असल्यावरही नसल्यासारखे तिचे हळवे जखमी मन अनेक संधिग्न हालचालींना मान्य करुन चांगले वाईट काय हे विसरते.तेंव्हा तिला समाजाशी ही काही घेणदेण नसते. तिचे मन कधी वाईट विचारांनी भरकटलेले असते. कधीकधी दुसऱ्याचे संसार उध्वस्त करतांना गैरमार्गाकडे ही वळतांना दिसत असतात. स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन उश्लृंखल प्रवृत्तीतुन, प्रसिद्धीच्या किंवा अन्य काही कमजोरीच्या आधीन जावून ती आपलच अहित करतांना दिसते.आणि स्त्रीच स्त्रीची शत्रु होतेय जळाउ वृत्ती उफाळून संपूर्ण स्त्रीजातीलाच कलंक लावत असतोय.
परंतू शिकुन सवरुन महिला कितीही मोठी असेल तरी तिला संसार मुलं,नवरा,नातलग हे सारे सांभाळावे लागत असते.आयुष्यभर घरसंसार,परीवार समाज नियम जपतच असते.तरीही तिची झोळी ही रीकामीच रहाते...
© मीनाक्षी किलावत
8888029763
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment