आई तुझ्या ऋणातुन कधी
मी होईल का मुक्त
कशी करू परतफेड
तुझ्याविणा मी ग रिक्त....।।
आभाळाची छत्र सावली
आईविणा नकळे वेडी माया
संकट येता धीर देवूनीया
पदराने देते ती उन्हातही छाया.....।।
परतफेड उपकाराची कधी
करू शकतच नाही
पण संस्काराची धरोहर
अंगावर ठेऊ देत नाही....।।
बाबांच्या अपार कष्टाने
आधाराचा अर्थ कळला
नसती त्यांची छत्रछाया
निराश्रीत भाग्य असे त्याला...।।
गुरुविणा भव्यसागरात
नसे कोणी आपणास आधार
करण्यासाठी परतफेड
नसे शब्द विचारांना आकार...।।
विश्वासाच्या परतफेडीत
नेहमी पारदर्शकता असावी
ठेवूनी निष्ठा जगावे शब्दाला
आपूलकिने व्यक्तित्व फुलवावी...।।
अनुभवांची देवानघेवान
पतपिढ्या सरू नये
घेण्यापेक्षा जास्त द्यावे
ऋण कोणाचे ठेऊ नये....।।
मीनाक्षी किलावत
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment