आई ( साबळे धनश्री सुरेश ) - साहित्य जत्रा

Breaking

Thursday, May 16, 2019

आई ( साबळे धनश्री सुरेश )

थकली  असशील कधीतरी
आज आत्ता या क्षणी  
एका जागी बसशील का?
सांगते तुला काहीतरी
जरा माझ ऐकुन घेशील का?

ऐकणार असेल तर सांगेल तुला
कहानी तुझ्या जीवनाची 
एकाच आयुष्यात तु 
केक जन्म जगल्याची..

अबला म्हण की सबला म्हण 
कदाचित, ते असेल तुझच दर्पण
तुझ्यासाठी करते मी,
माझ्या शब्दांना अर्पण.

लेक असो ,बहिण असो
गृहिणी असो वा माता.
दामिनी असो वा सौदामिनी 
किती सांगु आता तुझे गाथा..

मोबाईल असो ,लॅपटाॅप असो
तवा,कढई सुध्दा हाती असते.
सुई-दोरा हाती घेऊन तु,
संसारी तुझा शिवत असते.

पोटच्या मलाला शिकविण्यासाठी
मजबुरी मध्ये देह सुध्दा पेलुन देते.
मनातुन जरी खचली तरी
जिद्द मात्र टिकवुन ठेवते..

दिवस-रात्र खुप सोसतेय ती,
ह्रद्यातील भावना लपवताना 
वरवर हसते ती...

साबळे धनश्री सुरेश 
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी 

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages