"स्वावलंबनाचा मार्ग पत्करावा" (मीनाक्षी किलावत) - साहित्य जत्रा

Breaking

Wednesday, May 15, 2019

"स्वावलंबनाचा मार्ग पत्करावा" (मीनाक्षी किलावत)


    "स्वावलंबनाचा मार्ग पत्करूनच स्व:ताचा शोध घ्यायला पाहिजे.आणि स्वावलंबी जीवन जगुनच मनुष्याने आपली प्रगती साधली पाहिजे.स्वावलंबनाचा मार्ग जो पत्करेल तोच मणुष्य दुसऱ्याचे दुख समजू शकेल.आणि त्यांची सर्व कार्य कुशलतेने सर्वांची ह्रदय जिंकुन आयुष्यात यश संपादन करु शकेल.स्वावलंबनाचा स्वीकार करणे म्हणजे स्वतः वर पूर्ण विश्वास ठेवणे. नशिबावर अवलंबून न रहाता आपली क्षमता ओळखून आपली प्रगती साधणे, आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे.
    जगातले सर्वच महान पुरुष स्वावलंबी होते, आणि त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांना प्रेरणा देवून आपले मार्ग प्रशस्त केलेले होते. गुरु वशिष्ट ने माणस घडवली होती.ती माणस आपल्या कर्तृत्वाने देव झालीत. एकप्रकारे तेजस्वि सूर्या सारखी  या जगात चमकली.व जन स्रोत बनली. पण स्वावलंबन, परिश्रम आणि जिद्द ह्या गुणांमुळे ज्यांनी प्राविण्य मिळविले,ते अनेक कार्य करुन सिद्धिस गेले.म्हणून त्या माणवाना हिनवले,झिडकारले तरीही ते उच्च स्थानावर आरुढ झाले.त्यांनी लोकांच्या मनात घर केले.लेते सर्वस्वी,आत्मविश्वासाच्या जोरावर त्यानी मार्गक्रमन करून क्षितीज गाठले. म्हणुन त्यांना  मानाचे थाना स्थान  मिळाले. 
        आपण ही प्रयत्न केल्यास आकाशात भरारी घेऊ शकतो .मीपणा सोडून जीवनात दुसऱ्यांकडून प्रेरणा घेऊ शकतोय.पण आधी जीवनात काय साध्य करायचे ते आपणच ठरवायचे असते. ते साध्य करण्यास आपलेच हात आपणास मदत करत असतात. कष्टाशिवाय फळ कधिच मिळत नाही." देगा देवा पलंगावरी "ही म्हण माणसाला अपयशी करते. आजचे जग इतके वेगात धावत आहे की एका माणसाने संसारात कुटूंबाचा भार उचलने कठीन झाले आहे.महागाईवर मात करने ,म्हणजेच कठीण गढ चढणे आहे. म्हणून महिलांना स्वावलंबी होण्याची गरज फारच वाढलेली आहे.
महिलांनी त्यासाठी सदैव तयार अलायला पाहिजे.आज प्रगत देशात प्रगतिशील महिलांची गरज आहे.
-कधीही कोणतीही वेळ आफ्ल्यावर येवू शकते.त्यासाठी सदैव तयार राहिले पाहिजे.अापले कार्य व शक्तिही कामी लावली पाहिजे. कोणत्याही कामाची लाज बाळगू नये.
       जेंव्हा घरचे पुरुष बाहेरच्या कार्यात व्यसत असतात तेंव्हां हाउस वाइफ असल्यास एक जवाबदार गृहिणी होउन काही छोटी-मोठी कामें करण्याचा हरकत नाही. त्यामुळे घरची व्यवस्था व्यवस्थित असते.कधी कधी
 बँकेचे व्यवहार करायचे, भाजी मार्केटला जाउन पाव भाजीफळभाजी व किराणा सामान आणणे,ही वृत्ती प्रत्येक महिलेमध्ये असली पाहिजे.तसेच स्वसंरक्षण करणे,यासाठी पूरुषांवर अवलंबून न राहता आपले रक्षण करणे, स्वसंरक्षणार्थ तयार व्हायला पाहिजे. शिक्षण घेण्याची वयाला अट नसते, योग्य शिक्षण घेत रहाणे,वाचन केल्याने बुद्धीला चालना मिळत असते. किती ही सुविधा असल्या तरी महिलांनी रिकाम न बसता जे कला-कौशल्य आपल्या जवळ आहे त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे.आपल्या मुलामुलींवर चांगले संस्कार करून त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याची सवय लाविली पाहिजे.जीवनात कधी ही कोणती ही घटना घडू शकते,त्या सर्व गोष्टी लक्षात घेवुन स्वावलंबी जगायला पाहिजे.कुणावर आश्रित होण्यापेक्षा स्वता:समृद्ध व्हावे असं मला मनापासून वाटते.स्वावलंबी व्यक्ती कुठेच असफल होत नाही. तो पुरुष असोवा महिला असो.जवाबदारी प्रत्येकाने सांभाळली
पाहिजे.जेंव्हा त्याच्या कार्याला तो सर्व काही मानत असतो. जिद्दिने स्वावलंबी होवून शुन्यातून निर्मिती करून निर्भय व सुखी जीवनाचा फायदा म्हणजेच त्या व्यक्तीची मिळकत असते .त्यालाच आपण यशाची पुरचूंडी किंवा समाधान हमखास मिळवून देत असते. 
   परावलंबी पण आपल्याला पराजित करत असतंय कमीपणा आणतो. जो कुणाची मदत घेत नाही तोच
 खरा स्वावलंबी असतो. पण आजच्या युगात वेळप्रसंगी मदत ही घ्याविच लागते.वावग म्हंटल तर कुणाच्या मागे मागे फिरुन कोड कौतूक करुन पुढे गेलेले ही समाजात दिसतात.पण टीकून राहु शकत नाही.किति दिवस करणार स्तुती समोरच्यांना जेंव्हा स्वभाव समजतो तेंव्हा खाडकन नजरेतून उतरतो.आणि तो विश्वास गमावून बसतो. 

                                                                                                                                                             मीनाक्षी किलावत
8888029763

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages