जागतिक पुस्तक दिनानिमित्त तरूणाईने केलेले पुस्तकांचे वर्णन - साहित्य जत्रा

Breaking

Thursday, April 23, 2020

जागतिक पुस्तक दिनानिमित्त तरूणाईने केलेले पुस्तकांचे वर्णन

                  यश तुमच्या हातात -शिव खेरा


या पुस्तकात लेखकाने उदाहरण देऊन प्रत्येक गोष्ट खूप छान explain केली आहे आणि त्यातील काही गोष्टी जीवनाशी निगडित आहेत खूप शिकायला मिळालं पुस्तक वाचून.

स्नेहा झावरे 
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, मदडगाव

                The alchemist : paul coelho



 एका साहसी मेंढपाळ मुलाची  कहाणी. तो खजिन्याच्या शोधात निघाला होता. त्याने बरोबर काही मेंढ्या  घेतल्या आणि प्रवासाला लागला होता.  त्याचा जीवनात घडणाऱ्या शकुन आणि अपशकुन ह्यावर तसेच जादूवर विश्वास होता. खजिन्याचे ठिकाण हे वाळवंटातील पायरॅमिड्स होते.  तो तिथे पोहोचतो पण खजिना तिथे नसतो तो तर त्याने जेथून यात्रा सुरु केली तिथेच असतो.  
प्रेम,उत्साह, आशा, काळजी, स्त्री, शकुन, प्रेरणा, धैर्य, कष्ट, प्रवास, उंट, झोप, जाड पुस्तकांचे दुहेरी उपयोग, जादू, विरह, काचीचे दुकान, हज यात्रा, काहीही कर पण नवीन कर अशी वडिलांची शिकवण,  सोनं तयार करणारा  किमयागार, पाववाला, ती मुलगी, खजूर, हुजूर,........ अशा  कमालीच्या शब्दांनी भरलेली आणि मनाला अलगद माणसाच्या "धनाच्या  मागे लागण्याच्या प्रवृत्तीची " नालायक हाव समोर आणणारी काल्पनिक रहस्यमयी कादंबरी.
        
    शुभम सुभाष तुपे 
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी 

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages