मोबाईलच लागलेल व्यसन (सौरभ सुभाष केदार) - साहित्य जत्रा

Breaking

Sunday, December 30, 2018

मोबाईलच लागलेल व्यसन (सौरभ सुभाष केदार)

    मोबाईल वापरावा की नाही ?

   

मोबाईल फोन आपल जीवन सुखकर बनवण्यासाठी बनवले आहेत   मोबाईल इंटरनेटला दोषी ठरवणे म्हणजे साप सोडून भुई धोपटल्यागत आहे. नवीन तंत्रज्ञानाला केवळ काही वाईट घटना होतात म्हणून नाकारू नये, उलट दोषावर उपाय शोधून नविण्याने सामोरे जाणं म्हणजे आपले जीवन सुलभ करणे होय; परंतु हेच मोबाईल जीवनाचे शत्रू बनले तर ते चांगले संकेत नाहीत. मोबाईलच्या वापराबद्दल घरातील मोठे सदस्य लहान मुलांना कायम रागावतात पण सत्य हे आहे की मुलांसोबत आता वयाने मोठे माणसे सुद्धा मोबाईलच्या आहारी गेले आहेत.आणि त्यामुळे स्वतच आणि समाजाचं नुकसान होतय म्हणून हा एक चिंतेचा विषय बनलेला आहे.
     
    बोस्टन मेडिकल कॉलेज यांनी रेस्टोरंटमध्ये जेवणासाठी गेलेल्या काही परिवारावर 2014 मध्ये सर्व्हे केला आणि त्यांनी केलेल्या सर्व्हेनुसार

·         जेवण चालू असताना परिवरातील एक तृतींश सदस्य वारंवार मोबाईलमध्ये पाहत होते यादरम्यान मुलांनी आपल्या पालकांना बोलल्यावर पालक नाराज झाले

हार्वर्ड युनिवर्सिटीच्या एका संशोधनानुसार

·         मोबाईल फोनच्या माध्यमातून आपली माहिती जगापर्यंत पोहचवल्याने आपल्याला खूप आनंद होतो.
·         मोबाईल फोनचा जादा वापर करणार्‍या मुलांच्या मेंदूचा एक विशिष्ठ भाग प्रभावित होतो. त्यालाच इंसुला नावानं ओळखलं जात; आणि तो आपल्याला दुसर्‍याप्रती संवेदना, प्रेम,दया निर्माण करतो.

एका नवीन संशोधनानुसार

·         आपण वारंवार आपला मोबाईल पाहत असाल.
·          मित्रांसोबत गप्पा मारतांनासुद्धा तुमचा मोबाईल पाहत असाल
·         झोपताना सुद्धा तुमचा मोबाईल दूर ठेऊ शकण नसाल
·          गरज नसतांनासुद्धा मोबाईल उचकत असाल



तर तुम्ही मोबाईलच्या आहारी गेलेले आहात. आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर , आणि मनावर पण होतो
  • ·         कानामध्ये बिघाड
  • ·         मन दुखी
  • ·         बोटांमध्ये दुखणं
  • ·         भीती वाटणे
  • ·         चिंता वाटणे

        असे परिणाम मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे होतात. याप्रकारच्या व्यसनामध्ये अडकलेले लोक झोपण्याअगोदर आपला मोबाईल पाहतात आणि उठल्याबरोबर पहिलं काम मोबाईल पाहणे हेच असते.
       भारतामधील स्मार्ट फोन वापरणारे ५०% लोक मोबाईलवर गाणे ऐकतात आणि पाहतात.भारतातील सगळ्यात जास्त लोक व्हाट्सअप वापरतात. त्यानंतर गुगल,युटुब,फेसबुक यासारख्या अप्लीकेशनचा नंबर येतो. भारतामध्ये सध्या २२ करोड लोकांकडे स्मार्टफोन आहेत तर २६० करोड मोबाईल जगात आहेत. आणि मोठमोठ्या संशोधकांच्या मते मोबाईल आणि इंटरनेट पासून आपण काही काळ दूर राहील पाहिजे. आणि आता इंटरनेट नाशमुक्ती केंद्र निर्माण झालेले आहेत मोबाईलच्या आहारी गेलेल्या लोकांना मोबाईच्या संकटापासून सोडण्यासाठी..


      आजपर्यंत व्हाट्स अपचा लोक इतका जास्त वापरयेत की ते विसरेलेत की आपण काय फॉरवर्ड करतोय अशीच काही घटना मला एका वृत्तपत्रामध्ये वाचायला मिळाली, एक लहान मुलगा जत्रेत हरवलेला असतो म्हणून त्याचे आईवडील व्हाट्स अपला त्याचा फोटो सेंड करून त्याखाली लिहितात आमचा मुलगा कोणाला सापडला तर --------- या पत्त्यावर त्याला पोहचवा,ती पोस्ट वाचून त्यामुलला काही लोकांनी त्या  सुखरूप घरी पोहचवले; मुलाच्या आईवडिलांनी व्हाट्स अप वर आमचा मुलगा सापडला अशी पोस्ट केली.पण ती पोस्ट लोकांनी शेयर केली नाही आणि ती मुलगा हरवला ही पोस्ट आजपण सेंड होतेय.त्याचा परिणाम असा झाला की तो मुलगा आज शाळेत चालला असला तरी त्याला लोक पारत आणून घालतात म्हणून आपण काय शेयर करतोय याकड लक्ष दिल पाहिज.  

     आज मूले व्हाट्स अप च्या इतके आहारी गेलेत की डॉक्टर कुटुंबातील मुलाने चक्क आईचा खून केला का तर आईने व्हाट्स अप बंद कर त्याने तुझा वेळ वाया जातो अस सांगितलं. जर आपण व्हाट्स अप ला वरदान म्हणतोय तर अशी कृत्य का घडतात,का हरवतायेत संवेदना
   
     आजकाल कुटुंबामध्ये आजी-आजोबा घरात नसतात, आईवडील आपल्या कामानिमित्त घराबाहेर असतात आणि आपल बाल रडू नये म्हणून लहानपणीच त्याच्या हातात मोबाईल दिला जातो आणि लोकांना मोठ्या गर्वाने सांगतात आमचा मुलगा किती शहाणा आहे तो सगाळा मोबाईल वापरतो, गेम खेळतो. परंतु पालक विसरतायेत ज्या वयात मुलांना प्रश्न पडायला पाहिजेत त्या वयात मुलगा कार्टून किंवा मोबाईल खेळतोय आणि त्याच्या सगळ्या संवेदना आपन संपवतो.त्याला लहानपणी खेळू द्या पडू द्या रडू द्या पण मोबाईल आणि कार्टून पासून दूर ठेवा.

    सोशीयल मीडिया वापरल्याणे आपण सोशीयल  होत नसतो हे विसरता कामा नये. 
सोशीयल मीडियाचा सोसल तितकाच वापर करा, सोशीयल मीडिया आपल्याविकासाठी आहे, आपण सोशीयल मिडियसाठी नाही. हे नियमित लक्षात ठेवायला हवे.. काय असतं न अति तिथ माती हे विसरून चालणार नाही.... 
                                                                         
फायदे आणि तोटे.
                                                                             
  शब्दांकन 
  सौरभ सुभाष केदार 
  कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी. 
  ९११२७७५८७५/९४०५०९८६९४

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages