जीवनाच्या वाटा (संदीप पाटोळे) - साहित्य जत्रा

Breaking

Tuesday, January 22, 2019

जीवनाच्या वाटा (संदीप पाटोळे)

जीवनाच्या वाटा


जीवनाच्या वाटा
खाच खळग्यांच्या
जिद्द आणि पराकाष्टा
आपल्या प्रयत्नाच्या

असावे सकारात्मक
आपुल्या जीवनी 
प्रत्येक संकटाशी 
दोन हात करुनी

जीवनाच्या वाटेत 
सुख आणि दुःख 
तरीही रहावे 
सदा हसतमुख 

जीवनाच्या वाटे 
मोह, क्रोध मत्सर
काम, मद, लोभ पण
सदाचारात कसर

प्रत्येकाच्या जीवनी 
जन्म आणि मरण 
का सांगावी सबब 
उगाच विनाकारण

-------------------------------------
✍🏻संदीप पाटोळे,नंदुरबार.
       9421890770.

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages