सारे काही सत्तेसाठी
चल खेळ खेळु राजकारणाचा
करतो एकमेकांवर आरोप
चल सभेला जाता जाता
लावतो का झाडाचे एखादा रोप ?
सारे काही सत्तेसाठी
निवडणुकीत करता घाई
मत द्या माझ्या चिन्हाला
बायकोला म्हणतो ताई
निवडणुकीत नशीब बघण्या
जातो बुवाबाजी मांत्रिकाकडे
मतदार संघाचा विकास करता
जनतेचा वाकून पाया पडे
सारे काही सत्तेसाठी
बुद्धी गहाण तिकडे
पक्षश्रेष्ठींच्या मानासाठी
असते ग अंगण वाकडे
राजकारणाचा खेळात
मतदारांना घालतो साकडे
सारे काही सत्तेसाठी करता
कंबर अजून होते वाकडे..
------------------------------ -------
✍🏻संदीप पाटोळे,नंदुरबार.
9421890770.
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment