माझ्या अंगणी (संदीप पाटोळे) - साहित्य जत्रा

Breaking

Tuesday, January 22, 2019

माझ्या अंगणी (संदीप पाटोळे)

माझ्या अंगणी


माझ्या अंगणी
  खेळते गं तान्हुल
     ऊन बहुल

माझ्या अंगणी
   ऊन सावली खेळ
        मनाचा मेळ

माझ्या अंगणी
  येतं गं पै पाहुणा
       हर्ष जाईना

माझ्या अंगणी
  पक्ष्यांची किलबिल
        मनात सल

    माझ्या अंगणी
      आनंदाचा गं मेळा
            नवरा भोळा...
_____________________

✍🏻संदीप पाटोळे, नंदुरबार
      94 218 90 770

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages