जॅकी श्रॉफ त्यांच्या आई बाबतीत नेहमीच हळहळ व्यक्त करतात. ते म्हणतात , आम्ही गरीब होतो तेंव्हा चाळीच्या एका खोलीत संपूर्ण कुटुंब सामावून जायचे. रात्री झोपेत कुणाला खोकला लागला तरी ,आई उठायची आणि छातीला बाम लावायची.
कालांतराने श्रीमंती आली , मोठं घर घेतले आणि प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रूम घेतल्या गेल्या.
एका रात्री ,आईला अचानक हृदयवीकाराचा झटका आला , ती तड्फडली अन ओरडली पण मोठ्या घराच्या मोठ्या भींतीने एक वेगळीच भिंत तयार करून ठेवली आणि आमची आई नजरे आड झाली.
कधी कधी वाटतं, उगाच झालो श्रीमंत आणि ह्याच श्रीमंती मुळे आई गेली.
मित्रांनो अन मैत्रिणींनो , आपल्या माणसाच्या म्हणजेच त्यातल्या त्यात उतार वयातील आपल्या आई -वडिलांसोबत रहा.
*लहानपणी तुमची पाळण्यात नुसती हालचाल झाली तरी उठून बसणाऱ्या पालकांना जेंव्हा तुमची गरज असेल तेंव्हा तुम्ही नसाल तर त्याहून मोठे दुर्भाग्य कुठले नसेल. त्यांनी तुमच्यासाठी जेवढे केले आहे , त्याच्या १०% जरी तुम्ही केले तरी खुप आहे पण त्यांची साथ सोडू नका....* 🙏🙏🙏
(ऍक्टर-मॉडेल जॅकी श्रॉफ यांचे मनोगत.)
आशुतोष पडवळ
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment