सुखी संसार आणि सुखी कुटुंबाची स्वप्न सगळीच पाहतात आणि का पाहू नयेत? पण सुखी संसार प्रत्येक महिलेच्या वाट्याला येईल हे सांगता येत नाही.
काही कुटुंबामध्ये महिलाना खूप सन्मान दिला जातो तर काही कुटुंबातील
महिला परितक्त्याच जीवन जगतात. आता प्रसारमाध्यम, शासनाच्या योजना
काही स्वंयमसेवी संस्था महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न करत असल्या तरी खेडे गावांमध्ये
परिस्थिती खूपच वेगळी आहे. खेड्यातली स्त्री आजही पुरुष्याच्या अहंकारला आणि अत्याचारला
बळी पडते ह्या सर्वाचे चित्रीकरण पाशबंध चित्रपटामध्ये पहिले आणि एका पुरुषाच्या खोट्या
आत्मसन्मानची आणि तो करत असलेल्या कृत्याची लाज वाटली आणि पाशबंधच्या निमित्ताने मनाचे
बंध तोडून लिहावेसे वाटले म्हणून थोडेसे महिलांनाच्या आत्मसन्मानासाठी आणि त्या सहन
करत असलेल्या हाल अपेष्टांसाठी..
अशीच एक पाशबंध चित्रपटामध्ये धुळे जिल्ह्यातील
एक सत्य घटनेवर आधारित लाजिरवाणी घटना कथित केली आहे.
एका माऊलीने किती सहन यालाही काही मर्यादा असतात, नवरा बायको आणि ४ मुलांचा परिवार. पतीचे घरामधील मोलकरणीशी असलेले संबध, एक मुलगा गावात वारंवार चोरी करायचा त्यामुळे रोज घरामध्ये असलेले रोजचे भांडण
आणि नवर्याकडून होणारे अत्याचार याला कंटाळून माऊली घर सोडून भावाकडे जाते, त्याच काळामध्ये ती गरोदर असते. भावाच्या घरी राहून
नवर्याचा राग शांत होवून नवरा परत बोलवेल
याची वाट पाहत असते परंतु नवरा मात्र सोडचिठ्ठी पाठवतो त्यामुळे होणारी तिची अवस्था
पाहू शकणार नाही अशी असते . बिचारी तरीही लाचार होवून मुलांच्या प्रेमासाठी आणि समाजाच्या
वाईट नजारा थांबवण्याठी भावाशी भांडून नवर्याच्या घरी जाते परंतु नवरा लाथा बुक्क्याने
तिला मारून घराबाहेर काढतो, ती माऊली तरीही रात्रभर घराबाहेर
थांबते आणि सकाळ होताच नवर्याला विनंती करते तुम्ही ठेवाल तशी राहील पण आपल्या बाळासाठी
मला सांभाळा परंतु नवरा तिच्यावर खेकसतो आणि म्हणतो दुसर्याच पाप माझ्या डोक्यावर
फोडू नको आणि घराकडे परत फिरकू नको, बिचारी घरातून बाहेर पडते रानावनात भटकते, लोकांच्या
घरी जाते काम करते आणि सन्मानाने पोट भरते. दिवसेंदिवस पोटातील अर्भक मोठे होते, तिला समाजाकडून खूप चुकीची वागणूक दिली जाते, तिच्याकडून
खूप काम करून घ्यायचे, वाईट नजरेने पहायचे ती हळूहळू एकट जीवन
शिकून घेली पण तिने कोणापुढे हात पसरवले नाहीत.
काही
दिवसाने तिची प्रसूती झाली आणि तिला मुलगी झाली, ती
आता खूप जोमाने काम करू लागली समाजातील खूप लोकांनी पैसे मिळवण्यासाठी तिला देहविक्री
हा पर्याय दिला पण तिने कष्टाने पैसे कमावले, यासर्व तिच्यावर
ओढवलेल्या परिस्थितीने ती पूर्ण खचून गेली आणि त्यामुळे ती मुलीला स्वत:पासून थोड पण दूर करत नसायची पर्यायाने ती मुलगी शिक्षणापासून वंचित राहिली
पण तरीही संस्काराने श्रेष्ठ..
काही
दिवसांनी समाजातील चांगल्या लोकांनी त्या मुलीचा विवाह छान कुटुंबात केला, आणि त्या माऊलीला वेड्याच्या इस्पितळामध्ये पाठवण्यात आले. ती पूर्णपणे बरी
झाली पण तिच्या मुलाने तिला ओळखण्यास नकार दिला..
या
घटनेमधून तुम्हीच सांगा काय चुकल त्या माऊलीच
१.मुलांना
जन्म दिला आणि मुलांना जन्म देऊन मूल आपल्या आईला ओळखत नाहीत ?
२.नवर्याचे
अनैतिक संबंध आहेत हे माहीत झाल्यावर नवर्याला बोलली?
३.निमूटपणे
अत्याचार सहन करत राहिली ?
४.समाजाच्या
भीतीने नवर्याकडून होणारे अत्याचार सहन करत राहिली?
तुम्हीच विचार करा आणि ठरवा काय हो एक महिला
आपल्या कुटुंबाच्या लज्जेसाठी एवढा मोठा त्याग करू शकते आणि आपण पुरुष मंडळी काय करतो
पुरुष आहोत म्हणून महिलांवर अत्याचार.
पण
आता फक्त “बेटी बचाव बेटी पढाव” म्हणून चालणार नाही माझी
समस्त पुरूषांना विनंती आहे आपला पुरुषार्थ गाजावायचा असेल तर गाजावा पण “महिलांना
सन्मान देवून”, आणि महिलांनो ही वरील उदाहरणातील माऊली झालात
तर आयुष्यभर सहनच करत राहावं लागेल, म्हणून आता रणरगिनी व्हा
आणि अन्यायाविरुद्ध योग्य ठिकाणी आवाज उठवा आणि सन्मानाने जागा.
कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी
९११२७७५८७५/९४०५०९८६९४
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment