पावसाचे आगमन ( मीनाक्षी किलावत ) - साहित्य जत्रा

Breaking

Wednesday, June 26, 2019

पावसाचे आगमन ( मीनाक्षी किलावत )


मन पाऊस पाऊस कसा
शब्दावाचून सांगुन गेला
सूर सुगंधी मुग्ध मातिचा
हर्षवी क्षणात तनामनाला....

साक्षात्कार तो पावसाचा
कणाकणात सूरम्य भरला
ऋतु हिरवा ऋतु बरवा झाला
हिरवळतो साऱ्या पृथ्वीला.....

पाऊसाचा महिमा गाती सृष्टी 
कसा कुणी तो वर्णावयाचा
 सुगंधी मृदगंधीत पाऊस
 तनामनात भरवण्याचा......

त्रिभूवन दरवळतो गंधाराने
सरीता ही मदमस्त वाहती
निसर्ग फुलते यौवन घेवूनी
अद्भुत लीलया दाखविती......

ऋतु हिरवा ऋतु बरवा झाला
 गीत गाती पशुपक्षीही सारी
लता-वेली ही मोहरून जाती
पावसाचे आगमन देई तरतरी.....

धरती-पाताळ-नभात भरूनी  
पुन्हा नव्याने आशा स्फुरती 
 चींब चींब न्हाउनी मन हे 
पाऊसात  तृप्त होती.....

नभी मेघ निनाद गर्जून भारी
सनई,चौघडे,पखवाज वाजती
पावसाचा स्वैर इशारा होता
रवि-शशी ही वेडावून जाती...

© मीनाक्षी किलावत
8888029763

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages