झाड,वेली व वृक्षांना पण चेतना असतात असा वैद्यानीक शोध डाॅ.जगदीश चंद्र बोस यांनी लावला. त्यांनी झाडांवर विविध प्रयोग करून झाडाला पण संवेदना असते हे सिद्ध करून दाखविले. निसर्ग सृष्टित मानवी व प्राणीमात्रांचे जीवन सुरक्षीत राहण्यासाठी प्राणवायूची नितांत गरज असते. ही गरज वृक्ष भागवित असतात. कुठलीही अपेक्षा न बाळगता. कार्बन डायऑक्साइड व प्राणवायूची निर्मिती करणे हे वृक्षांचे काम असते. जेंव्हा एखाद्या व्यक्तीला प्राणवायूची गरज भासते तेंव्हाच प्राणवायूची किंमत कळत असते. थोड्यावेळ नाक दाबून ठेवा म्हणजे प्राणवायूचे महत्त्व कळते.
औद्योगिकीकरणामुळे ब्रम्हांडात आवश्यकतेपेक्षा जास्त कार्बन डाइऑक्साइड वायूचे उत्सर्जन होते आहे. यासाठीची नियमावली केंद्र सरकारने बनवलेली आहे. परंतु त्याचे पालन केले जात नाही. औद्योगिकीकरणामुळे व जबरानज्योत शेती करण्याने जंगलाची कटाई मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. याचे दुष्परिणाम मानवाला जाणवू लागल्याने तो पुर्नजंगल निर्माण करण्यास प्रवृत्त होतो आहे. यातूनच वृक्ष लागवडीची चळवळ ही जोर पकडते आहे. आपले जीवन वाचविणे हे वृक्षा़ंच्याच हाती आहे. करीता सर्व राज्य सरकारें वृक्ष लागवडीचे कार्यक्रम हाती घेत आहेत. ही समाधानाची बाब आहे. उशीरा कां होईना मानवाला जाग आलेली आहे. करीता वृक्ष चळवळीत आपले योगदान देऊन, वृक्ष लागवडीस सहकार्य करून वृक्षांचे संवर्धन करू या. ही काळाची गरज आहे.
* मिलिंद गड्डमवार, राजुरा
जिल्हा-चंद्रपूर(म.रा.)
भ्र. क्र. ९५११२१५२००
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment