गझल मंथन द्वारा राज्यस्तरीय गझल गायन महास्पर्धेचे आयोजन'
मुंबई दि. 24 ऑगस्ट: गझलसम्राट सुरेश भट यांनी मराठी गझल मराठी साहित्यविश्वात रुजवली. मराठी गझल अधिक सकस व्हावी या उद्देशाने सेवारत असलेल्या गझल मंथन समूहाच्या वतीने गझल मंथन यूट्यूब चॅनेलच्या उपक्रमा अंतर्गत राज्यस्तरीय गझल गायन महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहा फेऱ्यांमध्ये होत असलेल्या या गझल गायन महा स्पर्धेचे परीक्षण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक गझलकार तथा संगीतकार असलेल्या परीक्षकांकडून करण्यात येणार आहे. परीक्षण मंडळात प्रामुख्याने सुप्रसिद्ध गझलकार नितिन देशमुख, प्रसिद्ध गायक तथा संगीतकार महेश काकनाळे, सुप्रसिद्ध गायिका तथा गझलकारा सौ. धनश्री गणात्रा, सुपरसिद्ध गायक-संगीतकार श्री. रमेश राणे आणि प्रसिद्ध गायक -संगीतकार श्री.महेश बागुल यांचा समावेश राहणार आहे
विजयी गायकांना पारितोषिक अंतिम फेरीनंतर गझल मंथन समूहाच्या मराठी गझल महोत्सव समारंभात देण्यात येईल.पारितोषिकाचे स्वरूप प्रथम पारितोषिक रोख ४४४४ /- रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रोख ३३३३ /- रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि तृतीय पारितोषिक रोख २२२२/- रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र राहणार आहे.
स्पर्धकांना https://www.youtube.com/ channel/ UCAvmDGi7uw1EO0D36dFb2VA या गझल मंथन यूट्यूब चॅनेलवर दरमहा प्रदर्शित करण्यात आलेल्या गझलपैकीच एक गझल त्या महिन्यातील स्पर्धेसाठी गायन करून Audio फाईल पाठवावी लागेल. सदर महास्पर्धा ही दरमहा एक फेरी याप्रमाणे सहा फेऱ्यांत होईल व सहाही फेऱ्यांतील प्राप्त झालेल्या गुणांवरून प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन विजेते निवडण्यात येईल. प्रत्येक महिन्यातील स्पर्धेचा निकाल व गुण घोषित करण्यात येईल व दरमहा विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेतील विजेत्यांची इच्छा असल्यास त्यांना गझल मंथन यूट्यूब चॅनेलसाठी गझल गायन करण्याची संधी देण्यात येईल. यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन मिळणार नाही. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांचा वाॅट्सअॅप समूह स्थापन करण्यात येईल व तेथेच स्पर्धेचा निकाल व प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेसाठी पाठविण्यात आलेल्या गायन audio वर गझल मंथन समूहाचा हक्क राहील. सदर audio प्रदर्शित करण्याचे व इतर प्रकारचे सर्व हक्क गझल मंथन समूहास राहतील. अशाप्रकारचे सम्मतीपत्र दरमहिन्याला स्पर्धेत सहभागी होताना स्पर्धकांना द्यावे लागेल. गझल महा गायन स्पर्धेची पहिली फेरीची सुरुवात१५ सप्टेंबर २०१९ पासून होणार आहे. गायनाची आवड असलेल्या गायकांनी आयोजक अनिल कांबळे मो. ९०२९२५५४५२, जयवंत वानखडे मो. ९८२३६४५६५५, देवकुमार मो. ८८०६३६०७०९ यांच्या व्हाट्सअप क्रमांकांवर आपल्या ऑडिओ पाठवण्याचे आवाहन गझल मंथन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment