भारत एक असा देश आहे जिथे गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेणे कधीच सोपे नव्हते आणि नाही कारण येथे शिक्षणाला ज्ञानाच्या नजरेने नाही तर व्यापाराच्या नजरेने जास्त पहिले जाते. आणि याचमुळे भारतामध्ये शाळा, महाविद्यालये, क्लासेस चालवणारे बरेचसे लोक हे करोडपती बनले आहेत. परंतु आजपण समाजामध्ये असे खूप थोडे लोक आहेत जे शिक्षणाचा खरा अर्थ जतन करून ठेवत आहेत.
१ जानेवारी १९७३ रोजी
बिहारची राजधानी पटना येथे आनंद कुमार यांचा जन्म झाला, त्यांचे वडील पोस्ट
खात्यामध्ये नोकरीला होते. तर त्यांची आई जयवंतीदेवी घरकाम करत होती. वडील हे छोट्या
पदावर नोकरी करत असल्या कारणाने आनंदकुमार यांचे प्राथमिक शिक्षण हे सरकारी
शाळेमध्ये झाले.त्यानंतर आनंद कुमार यांनी त्यांचे शिक्षण पटना राष्ट्रीय
महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर ११९२ साली घरच्यांना आर्थिकदृष्ट्या मदत म्हणून
आनंद कुमार यांनी छोटी खोली भाड्याने घेऊन Ramanujan School Of Mathematics ची सुरुवात केली सुरुवातीला त्यांच्याकडे २ विद्यार्थी शिकवणीसाठी येत
पण त्यांच्या यशाकडे पाहून ५०० पेक्षा जास्त मुले आनंद सरकडे शिकवणीसाठी जाऊ
लागले. तसे पहिले तर आनंद कुमार याचं जीवन मजेत चालू होते पण ३ ऑगस्ट १९९४ राजी
त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्याच दरम्यान त्यांचे केंब्रीज विद्यापीठामध्ये
त्यांचा प्रवेश झाला दुःखाचा डोंगर आणि पैसे नसल्याने आनंद कुमार केंब्रीजला जाऊ
शकले नाहीत. आणि नोकरीदरम्यान वडिलांचा मृत्यू झाल्याने आनंदला वडिलांच्या जागी
नोकरी मिळत होती, परंतु मोठं काहीतरी करण्याची त्यांची जिद्द होती, त्यामुळे त्यांनी
ती नोकरी नाकारली, आणि आई बनवत असलेले पापड ते घरोघरी जाऊन विकत होते.असेच
दिवसामागून दिवस जात होते. त्याचदरम्यान वर्ष २००० मध्ये एक खूप गरीब विद्यार्थी
आनंद कुमार यांच्याकडे शिकण्याची इच्छा घेऊन आला, परंतु त्याच्याजवळ पैसे अजिबात
नव्हते पण त्याला आय आय टी मध्ये शिकण्याची जिद्द होती. आणि या मुलाकडून त्यांना
त्यांचे लहानपणीचे दिवस आठवले आणि त्यांना त्याची मदत करावीशी वाटली आणि त्यांच्या
डोक्यात सुपर ३० हि संकल्पना आली आणि २ वर्ष त्यांनी पैसे जमवले आणि २००२ पासून
सुपर ३० उपक्रम राबवला.
त्यामध्ये आय आय टी साठी मे
महिन्यात एक परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेची तयारी Ramanujan School Of Mathematics करून घेते त्यामध्ये सर्व मुलांना मोफत शिक्षण
आणि राहण्याखाण्याची व्यवस्थाही मोफत असते, आनंदची आई स्वयंपाक तर आनंदचा भाऊ सर्व
व्यवस्थापन करतो. हि संस्था जेव्हापासून नामांकित झाली तेव्हापासून अनेक सरकारी
निमसरकारी संस्थांनी मदत करण्याचे ठरवले पण आनंद कुमार यांनी कोणाची मदत घेतली नाही,
आणि या सुपर ३० मिशनचा खर्च पूर्ण Ramanujan School Of Mathematics संस्थान करते. आणि आज सुपर ३० फक्त भारत नव्हे तर जगातील अनेक देशात
प्रसिद्ध आहे. या सुपर ३० कार्यक्रमाची लोकप्रियता लक्षात घेऊन डिस्कव्हरी वाहिनीने
१ तासाचा चित्रपट बनवला. याचबरोबर द न्युओर्क टाईम्स आणि अशाच खुप अशा
अंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात सुपर ३० उपक्रम झळकला. आनंद कुमार देशातील विविध आय
आय एम आणि आय आय टी ला शिकवण्यासोबतच कोलंबिया विद्यापीठ, टोकियो विद्यापीठ, स्टमफोर्ड
विद्यापीठ आणि इतर प्रसिद्ध विद्यापीठामध्ये शिकवतात, त्याचबरोबर आनंद कुमार यांचे
नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे.त्याचबरोबर विश्व शिक्षा
पुरस्कार आणि इतर खूप नामांकित पुरस्कार मिळाले आहेत.
फक्त शाळा, महाविद्यालय,
आणि आपल्या क्लासचा निकाल १००% लागला म्हणजे आपण खूप आदर्श शिक्षक बनलो अस न समजता
प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्याला आपण शिकवत असलेल्या ज्ञानाचा जीवनामध्ये कसा आणि
कोठे वापर करता येईल हेही शिकवणे गरजेचे आहे, आज विद्यार्थी इंटरनेटवरपण शिकू शकतो
पण त्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच संस्कार कसे देता येतील, आज मुले मोबाईलचा वापर
प्रमाणापेक्षा जास्त करतांना दिसतात, त्यांना मोबाईलचा वापर कशाप्रकारे करायला लावावा,
अपयश कस पचवावं,यशामध्ये संयमी कसे राहावे,असे एक नाही अनेक आव्हाने शिक्षकांसमोर
आहेत.
या उदाहरणामधून आणि असलेल्या समस्येबद्दल मला
एकाच सांगायचं आहे कि भारताची शैक्षणिक प्रगती करायची असेल तर आपल्याला आनंद कुमार
यांच्यासारख्या असंख्य शिक्षकांची गरज आहे. आपणही एक कोणाचे तरी गुरु आहात आपण
सर्वाना योग्य मार्गदर्शन करा.
भारत आणि जगामधील शिक्षकीपेशा
निवडलेल्या सर्व गुरुजनांना माझा साष्टांग नमस्कार, आपल्या हातून देश कल्याणासाठी
लागणारे हात उत्तमरीत्या घडो आणि परमेश्वर आपणास उदंड आयुष्य, आणि समाजातील वाईट
वृत्तीचा नाश करण्याची ताकद देवो हीच परामेश्वरचरणी प्रार्थना...
आपण सर्वाना गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा
एक शिष्य
सौरभ सुभाष केदार
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment