नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यागोदार मी महात्मा गांधींचं एक वाक्य आठवण करून देऊ इच्छितो "Be the change that you wish to see in the world". म्हणजे जो बदल जगामध्ये करू इच्छिता तो बदल स्वतःपासून करा. तसा बारीक विचार केला त वर्ष तर नवं आहे, वर्ष तर बदललंय बाकी सगळं तसंच आहे, विचार जुनेच आहेत, व्यवस्था पण जुनी आहे आणि समाज सुद्धा जुनाच आहे आपल्या समस्या, आणि आव्हाणेसुद्धा पहिल्यासारखेच आहेत. तरीसुध्दा पूर्ण जगभर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सव साजरे केले जात आहेत.आपण फक्त नवीन वर्षाच्या स्वागत करून व्यस्त आणि मस्त होत जातो.
२०१९ चे २०२० झाले आणि याचप्रकारे चालू राहिले तर २०२० चे २०२१ होईल आणि २०२१ च २०२२ पण होईल, परंतु सत्य कधीच नाही बदलणार. आपली आव्हाने आपले संघर्ष कधीच बदलतं नाहीत, खर तर हे आहे वर्ष दरवर्षी बदलतं पण देशासमोरील समस्या बदलत नाहीत, देशावर लोकसंख्येच ओझं दिवसेंदिवस वाढतंच आहे. मागाच्यावर्षी हाल इतके वाईट नव्हते जितके आज आहेत, पुढच्यावर्षी हेच अवस्था अजून कठीण होताना पाहायला मिळेल यामुळे वर्ष बदलण्याचा आनंद साजरा करून काहीही होणार नाही.त्यामुळे नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्याचा विचार तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा वर्षाबरोबरच विचार देखील बदलतील, आपण बदलाल आणि आपलं जीवन देखील बदलेले.
तसं लिहायला बसल्यावर ठरवलं होतं की मी फक्त आणि फक्त चांगलंच लिखाण करेल पण दिवसभर शोधून सुद्धा कमीतकमी १० ते १२ चांगल्या बातम्या वाचायला मिळाल्या नाहीत, लोकसंख्या इतकी वाढलीय की रस्त्यावर चालायला जागा शिल्लक राहिली नाही, शुद्ध हवा श्वसनासाठी मिळणे, महिलांना रस्त्यावरुन सुरक्षितपणे चालणे अवघड झाले आहे, स्वच्छ पाणी, शिक्षणाचा अधिकार, वेळेवर उपचार करण्याचा अधिकार, अतिक्रमण विरहित रस्ते आणि बाजार हे सर्व मूलभूत गरजा आहेत आणि यालासुध्दा देशातील काही नागरिकांच्या वागणुकीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, म्हणजेच आपण जरी २०१९ मधून २०२० मध्ये प्रवेश केला असला तरी आपल्या समस्या जशाच्या तशाच आहेत.
२०२० या वर्षी समाजामध्ये बदल घडवण्याच्या प्रयत्नांत पडत बसण्यापेक्षा काही स्वतः संकल्प करूयात की स्वतःला आणि परिवाराला निरोगी आणि स्वच्छ हवा मिळण्यासाठी एक व्यक्ती एक वृक्ष संगोपन, तर आपल्या घरातील महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळून होणारे दुष्कृत्य थांबवण्यासाठी परस्त्री मातेसमान हया संस्कृतीचा आदर करत महिलांना सुरक्षितता प्रदान करण्याचा प्रयत्न करा, स्वच्छ पाणी दुष्काळ समस्या टाळण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवाची कास धरूया, शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे त्यापासून कोणी वंचित राहता कामा नये म्हणून बालमजुरीवर आळा घालूया, अपघातग्रस्तांना वेळेवर उपचारासाठी नेहमी तत्पर राहूया, त्याचबरोबर आपल्या हक्काबरोबरच दुसऱ्याच्या हक्काचं संरक्षण करता करता कर्तव्याचेदेखील भान ठेवण्याचा संकल्प करूयात आणि संकल्पपूर्ती करत डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम २०२० ला भारत महासत्ताक करण्याच्या स्वप्नाच्या पूर्तीच्या दिशेने पाऊल उचलूया...
नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा

No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment