लॉकडाऊन काळातील माझा प्रवास - साहित्य जत्रा

Breaking

Monday, May 25, 2020

लॉकडाऊन काळातील माझा प्रवास

 ‘करोना’ने आपल्या साऱ्यांनाच आपल्याच घरात बंदिस्त केले. घरातच बसून राहायचे म्हटल्यावर मग करायचे काय, असा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. मला मात्र तो पडत नाही, कारण मी माझ्या जुन्या छंदाकडे वळली आहे.लहानपणापासूनच मला नवनवीन सुशोभिकरणाच्या वस्तू बनवणे, चित्र काढणे ,जुनी नाणी गोळा करणे ,वर्तमानपत्रातील कात्रणे गोळा करणे या सर्वांची आवड.  त्या माझ्या छंदाचे पुनरुज्जीवन करण्याची संधी या ‘लॉकडाऊन’ने पुन्हा मिळवून दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या छंद जोपासणीत बराच खंड पडला होता. त्याकडे परत वळताना मिळत असलेला आनंद काही औरच! लॉकडाऊन मध्ये हे सर्व छंद मी पुन्हा नव्याने जोपासले. त्याचबरोबर नवनवीन पाककृती करण्याचीही आवड निर्माण झालीय. कॉलेजमुळे अवांतर पुस्तके  हातात घ्यायलाही वेळ झाला नव्हता. मात्र करोनाच्या सक्तीची सुट्टीची संधी साधून मी शिव खेरा यांचे “यश तुमच्या हातात”, मनोहर भोळे यांचे “राजमुद्रा”,सद्गुरू श्री. वामनराव पै. यांचे “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार” ही पुस्तके हाती घेतले. पुस्तक वाचनात वेळ निघून जातो कळतच नाही. आता मी ठरवले आहे, या लॉकडाऊनच्या काळात जेवढी पुस्तके  वाचता येतील तेवढी वाचून घ्यायची. अशी संधी पुन्हा मिळेल असे नाही. यातील शिव खेरा यांचे “यश तुमच्या हातात” हे मला भावलेले  पुस्तक. त्याचबरोबर online प्रशिक्षण ,शिबीर करणे यातही बराचसा वेळ निघून जातो .त्यातूनही मी खूप काही नवनवीन गोष्टी शिकले. राहिलेल्या वेळेत घरच्यांसोबत मनोरंजनाच्या गोष्टी ,शेतीकामात मदत ,मित्रामैत्रीनीसोबत गप्पा त्यामुळे ‘लॉकडाऊन’च्या काळातील वेळ चांगल्या प्रकारे जाऊ लागला आहे आणि उत्साही वाटत आहे. अशा सर्व आवडीच्या कामात दिवस कसा जातोय ते कळतही नाही. त्यामुळे या सक्तीच्या सुट्टीच्या काळातही कंटाळा येत नाही, शिवाय काही चांगले केल्याचे आणि सुट्टी कारणी लागल्याचे समाधानही मिळत आहे.  महत्त्वाचे म्हणजे हे सर्व सरकारी नियमांचे पालन करून .

                                                 स्नेहा बाबासाहेब झावरे

1 comment:

  1. Harrah's Casino in Tunica, Mississippi
    Harrah's Tunica Resort Casino 실시간 스포츠 스코어 The resort's 벳 365 2,200 room hotel is adjacent to its 윈벳 sister property, the 유흥 후기 Caesars 온라인포커 Sportsbook, so you can enjoy it

    ReplyDelete

Thank You For Visit and Comment

Pages