कोरोनाच्या भयानक वादळाची चाहूल लागली .. महाविद्याल्याना सुट्ट्या देण्यात आला . मग डोळ्यांसमोर प्रश्न उभा राहिला आत्ता करायचं काय बरेच दिवस हाच विचार करण्यात गेले . तोपर्यंत मज्जा केली खूप onln लुडो खेळणे बाकीचे गेम खेळणे .. पण त्या काळात अजून एक छान गोष्ट झाली ती म्हणजे नवीन नवीन लोकांशी ओळख व्हायला लागली
अजून एक छान गोष्ट ज्या लोकांशी आधी ओळख होती , पण आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे वेळच नाही भेटायचा एकमेकांशी बोलायला कधी इच्छा असून पण कधी बोलण नाही व्हायचं ते ह्या lockdown मूळे शक्य झालं ....खूप दिवसांनी त्या लोकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या .कुटुंबीयांसोबत घालवायला खूप वेळ मिळाला गप्पा, गाणी, जुन्या गोष्टीना उजाला मिळला
हे सगळ झाल पण ह्यानंतर काय हा प्रश्न सतत मनात येत होता. पण मनाशी एवढ पक्क ठरवलेलं होत की ह्यानंतर जगासमोर जाईल ती आधीची मी नसेल ती आत्ता मी आहे त्यापेक्षा जास्त वेगळी असेल ती all-rounder असेल अशी कोणतीच गोष्ट नसेल जी मला जमणार नाही...बाईक चालवणे, नवीन नवीन पदार्थ बनवणे ,प्राणायाम हे सगळ सुरू केल आणि खूप अश्या गोष्टी केल्या ज्या गोष्टी मी कदाचित वेळ नाही ह्या बहाण्याने आयुष्यभर करू शकले नसते.. जसकी मॉडेलिंग , ब्लॉग लिहिणे, आरोग्याच्या विषयक माहिती मिळवून ती अवलंबणे .... ओळख झालेल्या नवीन लोकांकडून छान छान शिकायला भेट होत ...आणि अजून पण शिकतेय.
साधा मोबाईल आहे पण त्यावर इतके छान छान ऍप्लिकेशन आहे हे आत्ता लक्ष्यात आल . तंत्रज्ञानचा खूप छान वापर ह्या दिवसांत केला . ह्या संकटकाळाचा स्वतःच्या सर्वांगिण विकासात खूप फायदा झाला ....
-श्रद्धा राजेंद्र दराडे
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment