कौशांम्बी फाऊंडेशन'तर्फे ऑनलाईन काव्य घोषवाक्य निबंध स्पर्धेचे आयोजन... - साहित्य जत्रा

Breaking

Wednesday, July 1, 2020

कौशांम्बी फाऊंडेशन'तर्फे ऑनलाईन काव्य घोषवाक्य निबंध स्पर्धेचे आयोजन...

प्रतिनिधी वजीर शेख...
     
 
कौशंम्बी फाउंडेशन कला, क्रीडा, साहित्य, कृषी संशोधन क्षेत्रांमध्ये भरीव काम करणारी संघटना आहे. ही संस्था पूर्ण भारतभर कार्यरत होत आहे.
    कृषी दिनाच्या औचित्यावर आपण "बीजांकुर" स्पर्धा आयोजित करत असून ही स्पर्धा वेगवेगळ्या विभागात घेतली जाणार आहे. यामध्ये चित्रकला, घोषवाक्य, पत्रलेखन, निबंध लेखन असे विभाग असून आपले साहित्य agrimaharashtra2020@gmail.com वर दिनांक २ जुलै २०२० पर्यंत पाठवावे. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा नाही. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. प्रत्येक विभागातील प्रथम पाच विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र दिले जातील. निवड समितीमध्ये प्रेरणा अभंग, सारिका पुलाटे, श्रद्धा रणपिसे, आणि शिवानी शिंगवी तर प्रमुख अतिथी श्री संदीप पाटोळे कृषी पर्यवेक्षक महाराष्ट्र शासन हे असून बक्षीस वितरण ७ जुलै २०२० रोजी होणार आहे.
          असे कोशंबी महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ केदार, सचिव वजीर शेख, उपाध्यक्ष विलास काजळे आणि संयुक्त सचिव स्नेहा झावरे यांनी  सांगितले.

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages