कृषी कायदा समज गैरसमज (सौरभ सुभाष केदार) - साहित्य जत्रा

Breaking

Sunday, September 5, 2021

कृषी कायदा समज गैरसमज (सौरभ सुभाष केदार)



 १) शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत हमी आणि कृषीसेवाविषयक करार कायदा, 2020 [Farmers (Empowerment and Protection) Agreement of Price Assurance and Farm Services Act, 2020]

या कायद्याला करार शेती विधेयक असेही म्हटले जाते.


कायद्यातील प्रमुख तरतुदी

- शेतकन्यांना आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, कृषिमाल प्रक्रिया उद्योग व उद्योजक किंवा कंपन्या यांच्याशी करार करता येईल.

- या कराराद्वारे शेतीमालाची किंमतही निश्चित करता येईल.

- 5 हेक्टरपेक्षा कमी जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांना या कंत्राटांचा करारांचा फायदा होईल.

- बाजारपेठेतल्या अस्थिरतेची जोखीम शेतकऱ्यांवर न राहता त्यांच्या कंत्राटदारांवर असेल.


या कायद्यातील तरतुदींमुळे होणारे लाभ

- या नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या घटकाशी स्वतंत्रपणे व्यवहार करू शकतील .

- शेतकऱ्यांची बाजारपेठेच्या अनिश्चिततेविषयीची जोखीम कमी होईल.

- शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल.

- शेतकऱ्यांचा विपणन खर्च कमी होऊन उत्पादकतेत वाढ होईल,

- शेतकरी थेट विपणन क्षेत्रात उतरत असल्यामुळे दलालांकडून होणारी फसवणूक बंद होऊन शेतकन्यांना शेतमालाची योग्य किंमत मिळेल.

- हा कायदा राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठांमध्ये भारतीय शेतीच्या उत्पादनांची पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी तसेच खासगी क्षेत्राची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व कृषी पायाभूत सुविधाकरिता लाभदायक ठरेल.

- शेतकऱ्यांना जमीन विक्री करण्यावर, जमिनीपासून भाडे मिळवण्यावर किंवा जमीन गहाण ठेवण्यावर बंदी आहे. यासंबंधी काही वाद निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना निमित कालमर्यादेत न्याय मिळण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा या विधेयकाद्वारे पुरवण्यात येईल.


२. कृषी उत्पादन व्यापार, व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) कायदा, 2020 [Farmers Produce and Commerce (Promotion and Trade Facilitation) Act, 2020


उद्देश

- शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना विक्री आणि सारेदीसाठी निवडीचे स्वातंत्र्य उपलब्ध करून देणे व योग्य दर, पारदर्शकता आणि राज्य कृषी उत्पन्न विपणन कायद्यांतर्गत अधिसूचित बाजारपेठेच्या आवारांच्या बाहेरील अडथळा मुक्त आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य व्यापार उद्योग, बाजारपेठांच्या बाहेर तसेच ऑनलाईना पद्धतीने व्यापार सुलभ करणे,

- विपणन आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगला भाव मिळवून देणे.


या कायद्यातील प्रमुख तरतुदी

- शेतकरी व व्यापाऱ्यांना कृषी उत्पादनांची विक्री व खरेदीची स्वतंत्रता मिळेल.

शेतकरी आपला शेतमाल देशाच्या कोणत्याही भागात नेऊन त्याची विक्री करू शकतात.

- शेतकरी ऑनलाइन शेतमाल पद्धतीनेसुद्धा विक्री सुद्धा करू शकतात.

- इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे

- कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर शेतमालाची विक्री करण्यात आल्यास राज्य सरकार बाजारशुल्क, सेस (सेस हा टॅक्सवर लावला जाणारा उपकर असतो.) किंवा लेव्ही आकारू शकणार नाही.

- शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांवर कोणताही अधिभार किंवा उपकर आकारला जाणार नाही.

- शेतकन्यांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभारण्यात येईल.

- शेतमालाच्या व्यापारासाठी कोणताही परवाना बंधनकारक नसेल.

पैन कार्ड असलेली कोणतीही व्यक्ती थेट शेतकन्यांकडून शेतमाल खरेदी करू शकेल.


या कायद्यातील तरतुदीमुळे होणारे लाभ

- नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना कृषी उत्पादनांच्या खरेदीविक्रीचे स्वातंत्र्य मिळेल.

- अडथळामुक्त आंतरराज्य व्यापाराला चालना मिळेल.

- शेतकऱ्यांचा विपणन खर्च कमी होईल.

- शेतमालाला चांगला भाव मिळून उत्पादकता वाढण्यास मदत होईल.


३. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा, 2020 [Essential Commodities (Amendment) Act 2020

- शेतकरी थेट विपणन क्षेत्रात उतरत असल्यामुळे दलालांकडून होणारी फसवणूक बंद होऊन शेतकन्यांना शेतमालाची योग्य किंमत मिळेल.

- कडधान्ये, डाळी, तेलबिया छायतेल, कांदे आणि बटाटे यांसारख्या वस्तू अत्यावश्यक वस्तू सेवा कायद्यातून वगळण्यात आल्या.

- ह्या कायद्यामुळे शीतगृहातील, तसेच धान्य पुरवठा साखळीतील आधुनिकीकरणाला चालना मिळेल, याचे फायदे शेतकन्यांना, तसेच ग्राहकांनाही होऊन वस्तूंच्या किंमती स्थिर राहतील.

- धान्य उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि पुरवटा या बाबींचे स्वातंत्र्य मिळाल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर

चांगला परिणाम होईल आणि त्यामुळे कृषी क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. यामुळे शीतगृहे किंवा अन्नधान्य पुरवठ्याची सुधारित व्यवस्था या गोष्टींना चालना मिळेल,

- युद्ध, दुष्काळ, किंवा इतर नैसर्गिक आपती अशा असाधारण परिस्थितीत भाववाद, धान्य पुरवठ्यासंबंधी नियंत्रण आणले जाईल. मात्र, संबंधितांनी मूल्य साखळीत केलेली गुंतवणूक आणि निर्यातीसाठी नोंदवलेली मागणी यांना असाधारण परिस्थितीतही शेतीमालाचा, वस्तूंचा साठा करण्याची मुभा असेल. यामुळे या क्षेत्रातील खासगी वा परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल.


वरील ३ कायदे हे आत्मनिर्भर भारताचा भाग असलेल्या कृषी सुधारणेचा मुद्दा असल्याकारणाने सरकारने ५ जून २०२० ला 3 अध्यादेश काढले.

- संविधानिक तरतुदीनुसार त्या अध्यादेशाला ६ महिन्याच्या आत संसदेची मान्यता मिळविणे आवश्यक असते.

- या अध्यादेशाला सप्टेबर २०२० मध्ये संसदेने पावसाळी अधिवेशनात मान्यता दिली.

- परंतु या कायद्याला शेतकऱ्यांकडून व विरोधकाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

शेतकरी कायद्याला विरोध का होत आहे ?

- कृषी बाजार हा राज्य सूचीचा विषय परंतु त्यावर केंद्र सरकार कायदा करत आहे.

- कृषी बाजार नष्ट झाला, तर शेतकऱ्यांना किमान हमीभाव (MSP) मिळू शकणार नाही.

- एक देश एक MSP हवे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

- शेतमालाची किंमत निश्चित करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने काही खासगी कंपन्यांकडून शेतक-यांची पिळवणूक होऊ शकते.

- दलाल अडत्यांची आर्थिक पत पाहूनच त्यांना परवाना दिलेला असतो, परंतु यात तशी तरतुद नाही.

- व्यापारी साठेबाजी करण्याची शक्यता असल्याने बाजारात अस्थिरतेसह महागाई वाढण्याची शक्यता.

- राज्यात योग्य किंमत न मिळाल्यास शेतकरी शेजाही राज्यांत जाऊन आपला माल विकतील, यामुळे राज्यामध्ये पिकांसंबंधी काही समस्या निर्माण होऊ शकतात.

- कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी सक्षमपणे वाटाघाटी करू शकतील का?

- अनेक लहान-लहान शेतकऱ्यांशी करार करण्यात व्यावसायिक रस दाखवतील का?

- शेतकऱ्यांना कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन करावं लागेल आणि कमी किंमत मिळण्याचीही भीती

- धान्य, खाद्यतेले, कांदा-बटाटा या आवश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकल्याने त्यांचे उत्पादन, साठवणूक, वितरण यांचे नियमन होणार नाही. यामुळे अन्नसुरक्षेबाबत (प्रामुख्याने गरिबाच्या) विधेयकात विचार केलेला नही

- अध्यादेशामुळे राज्यांच्या उत्पन्नाचा एक स्रोत कमी होईल.

- किमान आधारभूत किंमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल

- e-NAM सारख्या ई-ट्रेडिंग यंत्रणा बाजारांवर अवलंबून असतात. बाजारच नामशेष झाले तर त्या कशा चालतील?

- पंजाब विधानसभेने २८ ऑगस्ट २०२० रोजी या केंद्राच्या अध्यादेशाविरोधात ठराव पारित केला.


विरोधाला समर्थन म्हणून महत्वाच्या घटना.

- कॅबिनेट मंत्री हरसीम्रत कौर बादल यांनी कृषी विधेयक/कायद्गाारून आपल्वा मंत्यीपदाचा राजीनामा दिला.

- पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी कृषी कायद्याच्या निषेधार्थ आपला पद्म विभूषण पुरस्कार परत केला.

- कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी ०८/१२/२०२० ला भारत बंद'ची हाक दिली आहे.


संकलन व मांडणी

सौरभ सुभाष केदार

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages